भारतात २४ तासांत आढळले ३.२६ लाख नवे कोरोना रुग्ण

भारतात २४ तासांत ३ लाख २६ हजार ९८ नवे कोरोना रुग्ण आढळले. देशातील कोरोना रुग्णांपैकी ३ लाख ५३ हजार २९९ जण मागील २४ तासांमध्ये बरे झाले.

3.26 lakh new covid19 cases in india
भारतात २४ तासांत आढळले ३.२६ लाख नवे कोरोना रुग्ण 

थोडं पण कामाचं

  • भारतात २४ तासांत आढळले ३.२६ लाख नवे कोरोना रुग्ण
  • देशातील कोरोना रुग्णांपैकी ३ लाख ५३ हजार २९९ जण मागील २४ तासांमध्ये बरे
  • कोरोनामुळे मागील २४ तासांमध्ये देशात ३ हजार ८९० मृत्यू

नवी दिल्ली: भारतात २४ तासांत ३ लाख २६ हजार ९८ नवे कोरोना रुग्ण आढळले. देशातील कोरोना रुग्णांपैकी ३ लाख ५३ हजार २९९ जण मागील २४ तासांमध्ये बरे झाले. कोरोनामुळे मागील २४ तासांमध्ये देशात ३ हजार ८९० मृत्यू झाले. 3.26 lakh new covid19 cases in india

आतापर्यंत भारतात २ कोटी ४३ लाख ७२ हजार ९०७ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी २ लाख ६६ हजार २०७ जणांचा मृत्यू झाला. २ कोटी ४ लाख ३२ हजार ८९८ जण कोरोनामुक्त झाले. भारतात सध्या ३६ लाख ७३ हजार ८०२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

देशाचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट ८३.८३ टक्के आहे. भारताचा कोरोना मृत्यू दर १.०९ टक्के आहे. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे देशात १८ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी