पीएम मोदींच्या रामराज्याला नागरिक कंटाळलीत? तीन वर्षांत 3.9 लाख लोकांनी सोडलं भारतीय नागरिकत्व

लाखो लोकांनी भारताचं नागरिकत्व (Indian Citizenship) सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या तीन वर्षांत सुमारे 4 लाख लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आहे. सरकारच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी संसदेत ही माहिती देण्यात आली आहे.

3.9 lakh people renounced Indian citizenship in three years
तीन वर्षांत 3.9 लाख लोकांनी सोडलं भारतीय नागरिकत्व  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वैयक्तिक कारणास्तव 3.9 लाख लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं
  • भारताच्या 48 लोकांनी पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारलं

नवी दिल्ली : लाखो लोकांनी भारताचं नागरिकत्व (Indian Citizenship) सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या तीन वर्षांत सुमारे 4 लाख लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आहे. सरकारच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी संसदेत ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या 3 वर्षात 3.9 लाख लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं असून हे लोक जगातील 103 देशांमध्ये स्थायिक झाले आहेत.

बसपा खासदार हाजी फजलुर रहमान यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, या लोकांनी वैयक्तिक कारणास्तव भारताचं नागरिकत्व सोडले आहे. आकडेवारीनुसार, 7046 लोकांनी सिंगापूर, 3754 लोकांनी स्वीडन, 170 लोकांनी बहरीन, 2 जणांनी अंगोल, 21 जणांनी इराण आणि 1 जणांनी इराकचं नागरिकत्व स्वीकारलंय. याशिवाय, 1400 हून अधिक लोकांनी चीनचं नागरिकत्वही घेतलं आहे. तसेच भारताच्या 48 लोकांनी पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारलं आहे.

अमेरिका आवडली

अमेरिकेला सर्वाधिक भारतीयांची पसंती आहे. 2021 या वर्षात 1.63 लाख लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं शेअर केलेल्या अहवालानुसार, गेल्या वर्षी 78,000 हून अधिक लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे. 2019 मध्ये 61683 लोक, 2020 मध्ये 30828, 2021 मध्ये 78284 लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले आहे. तर कॅनडा अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकाचे पसंतीचे ठिकाण बनले आहे, जिथं भारतीयांनी नागरिकत्व घेतलं आहे.

कॅनडा, ऑस्ट्रेलियात हजारो लोकांनी नागरिकत्व स्वीकारलं

कॅनडा : 2019 मध्ये 25381, 2020 मध्ये 17093, 2021 मध्ये 21597 लोकांनी नागरिकत्व स्वीकारलं. तर 2019 मध्ये 21340, 2020 मध्ये 13518 आणि 2021 मध्ये 23533 जणांनी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. यानंतर यूके, इटली, न्यूझीलंड, जर्मनीचा क्रमांक लागतो, जिथं सर्वाधिक भारतीयांनी नागरिकत्व घेतलं आहे. 2019 मध्ये 1.44 लाख भारतीयांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आहे, तर 2020 मध्ये 85256 लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलंय.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी