3 Maharashtra Police officials awarded the prestigious Shaurya Chakra : महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या पोलीस दलातील तीन जणांना मानाचे शौर्य चक्र पदक जाहीर झाले. नक्षलवाद्यांविरोधात धडक कारवाई केली म्हणून हा गौरव करण्यात येणार आहे. याआधी २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात जी कारवाई केली होती त्याची दखल घेऊन शौर्य चक्र जाहीर करण्यात आले होते. यानंतर २०२२ मध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रातील पोलीस दलाला शौर्य चक्र हा बहुमान मिळत आहे.
शांतता काळात दिले जाणारे शौर्य चक्र हे तिसरे मोठे पदक आहे. एरवी शौर्य चक्र, किर्ती चक्र आणि अशोक चक्र ही पदके शांतता काळात लष्करातील वीरांना जाहीर केली जातात. पण अपवादात्मक स्थितीत पोलिसांना ही पदके दिली जातात. याआधी २००९ मध्ये मुंबई पोलीस दलाला शौर्य चक्राचा मान मिळाला होता.
गडचिरोली जिल्ह्यातील मार्डीनटोला जंगलात १३ नोव्हेंबर २०२१ रोजी नक्षलवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत पोलिसांनी मोठी कामगिरी केली होती. या चकमकीत एकूण २७ नक्षलवाद्यांना ठार केले होते. मृतांमध्ये मिलिंद तेलतुंबडे हा नक्षलवाद्यांचा एक प्रमुख नेता पण होता. या कामगिरीची दखल घेऊन आयपीएस अधिकारी सोमय मुंडे आणि दोन नाईक पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र नैताम आणि टिकाराम काटेंगे यांना शौर्य चक्र पदक जाहीर करण्यात आले आहे.
पोलीस दलात कार्यरत असताना नेमणुकीच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा गडचिरोली पोलीस दलातील ४० अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक व २ पोलीस अंमलदार यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.
1) मनिष कलवानिया भापोसे. पोलीस अधीक्षक, औरंगाबाद 2) समीर शेख भापोसे., अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली 3) भाऊसाहेब ढोले, डिवायएसपी 4) पोनि संदिप भांड 5) पोनि संदिप मंडलिक (1st BAR to PMG) 6) सपोनि महारूद्र परजने 7) सपोनि मोतिराम मडावी (1st,2nd BAR to PMG) 8) सपोनि योगिराज जाधव 9) पोउपनि राजरत्न खैरनार 10) पोउपनि दयानंद महाडेश्वर 11) पोउपनि हर्षल जाधव 12) शहीद पोेउपनि धनाजी होनमाने (मरणोत्तर) 13) पोहवा/ स्व. जगदेव मडावी (मरणोत्तर) 14) पोहवा/ सेवकराम मडावी 15) नापोशि/ राजु कांदो 16) नापोशि/ दामोधर चिंतुरी 17) नापोशि/ राजकुमार भलावी 18) नापोशि/ सागर मुल्लेवार 19) नापोशि/ शंकर मडावी 20) नापोशि/ रमेश आसम 21) नापोशि/ जिवन उसेंडी 22) नापोशि/ राजेंद्र मडावी 23) नापोशि/ मनोज गज्जमवार 24) नापोशि/ सुभाष गोंगले 25) नापोशि/ दसरू कुरसामी 26) पोशि/ अविनाश कुमरे 27) पोशि/ गोंगलु तिम्मा 28) पोशि/ महेश सयाम 29) पोशि/ साईकृपा मिरकुटे 30) पोशि/ रत्नय्या गोरगुंडा 31) पोशि/ विलास पदा 32) पोशि/ मनोज इस्कापे 33) पोशि/ अशोक मज्जी 34) पोशि/ देवेंद्र पाकमोडे 35) पोशि/ रोहित गोंगले 36) पोशि/ दिपक विडपी 37) पोशि/ सुरज गंजिवार 38) शहीद पोशि/ किशोर आत्राम (मरणोत्तर) 39) पोशि/ योगेश्वर सडमेक 40) पोशि/ अंकुश खंडाळे,41)पोशी/गजानन आत्राम या जवानांना पोलीस शौर्य पदक मिळाले असून, 1) सहा.फौ/ प्रविण बेझलवार 2) सहा.फौ/ प्रमोद ढोरे यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाले आहे.