Turkey Earthquakes : तुर्कस्तानात 24 तासांत 3 मोठे भूकंप 2300 पेक्षा जास्त मृत्यू; 10 महत्त्वाचे मुद्दे

3 Powerful Earthquakes In Turkey In 24 Hours, More Than 2300 Killed : तुर्कस्तान या देशाला तुर्की आणि टर्की या दोन नावाने ओळखले जाते. मागील 24 तासांपासून या देशाची चर्चा फक्त भूकंपांसाठी सुरू आहे.

3 Powerful Earthquakes In Turkey In 24 Hours, More Than 2300 Killed
तुर्कस्तानात 24 तासांत 3 मोठे भूकंप  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • तुर्कस्तानात 24 तासांत 3 मोठे भूकंप 2300 पेक्षा जास्त मृत्यू; 10 महत्त्वाचे मुद्दे
 • तुर्कस्तानमध्ये सोमवारी भल्या पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी 7.8 रिश्टर क्षमतेचा भूकंप
 • नंतर पुढील 24 तासांत अनुक्रमे 7.6 रिश्टर आणि 6 रिश्टरचा भूकंप

3 Powerful Earthquakes In Turkey In 24 Hours, More Than 2300 Killed : तुर्कस्तान या देशाला तुर्की आणि टर्की या दोन नावाने ओळखले जाते. मागील 24 तासांपासून या देशाची चर्चा फक्त भूकंपांसाठी सुरू आहे. तुर्कस्तानमध्ये मागील 24 तासांत 3 मोठ्या भूकंपांसह एकूण 65 पेक्षा जास्त भूकंपाचे धक्के बसले आहेत. तुर्कस्तानला सर्वात मोठा भूकंपाचा धक्का सोमवारी भल्या पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी हा 7.8 रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का होता. यानंतर पुढील काही तासांत 2 आणखी मोठे भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपांमुळे तुर्कस्तान आणि सीरिया या दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले. प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. भूकंपांमुळे सगळे नष्ट झाले. या धक्कादायक घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारे हे 10 महत्त्वाचे मुद्दे...

Parvez Musharraf death: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन

China News : चिनी फुग्यातून हेरगिरीचा प्रयत्न

 1. तुर्कस्तानमध्ये सोमवारी भल्या पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी 7.8 रिश्टर क्षमतेचा भूकंप. यानंतर पुढील काही तासांत 2 आणखी मोठे भूकंपाचे धक्के (अनुक्रमे 7.6 रिश्टर आणि 6 रिश्टर) बसले. या भूकंपांमुळे तुर्कस्तान आणि सीरिया या दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी.
 2. सीरिया : देशाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात भयानक भूकंप. आतापर्यंत 810 ठार. मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याची भीती.
 3. तुर्कस्तान : आतापर्यंत 1490 ठार. मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याची भीती. भूकंपाचे धक्के इस्तंबूल, अंकारा, इरबिल यांच्यासह इराकमधील कुर्दिस्तानमध्येही जाणवले.
 4. भूकंपांमुळे लाखो नागरिक झाले बेघर. अनेक कुटुंबांची वाताहात.
 5. भूकंपामुळे 3400 पेक्षा जास्त इमारती कोसळल्या. 
 6. पायाभूत सुविधा कोलमडल्या. रस्ते, पूल, उड्डाणपूल नष्ट झाल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प.
 7. वैद्यकीय सेवांचा बोजवारा उडाला. अनेक ठिकाणी उघड्यावर मदतकार्य करणाऱ्यांकडून वैद्यकीय मदत देण्याचे प्रयत्न. देशातील सुस्थितीत असलेल्या हॉस्पिटलमध्ये जखमींची उपचारांसाठी गर्दी.
 8. भूकंप झालेल्या भागांमध्ये वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडीत.
 9. भारत, रशियासह जगभरातील अनेक देशांमधून मदत रवाना. भूकंप झालेल्या भागांमध्ये मदतकार्य सुरू. भूकंप झालेल्या भागांतील विमानतळ सुरक्षिततेच्या कारणांमुळे बंद केले. मदत लांबच्या विमानतळावर उतरवून रस्ते मार्गाने रवाना करण्यास सुरुवात. उखडलेल्या रस्त्यांवरून सावधपणे आणि सावकाश अत्यावश्यक वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्याचे प्रयत्न.
 10. तुर्कस्तानमध्ये कडाक्याची थंडी. काही भागांमध्ये हिमवृष्टी झाल्यामुळे मदतकार्याचा वेग मंदावला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी