भारतीय सैन्याची मोठी कारवाई, तीन दहशताद्यांचा खात्मा 

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात सैन्य दलाची मोहीम सुरू आहे. रविवारी शोपियां जिल्ह्यात भारतीय सैन्यदलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 

3 terrorists killed in reban area of shopian jammu kashmir
भारतीय सैन्याची मोठी कारवाई, तीन दहशताद्यांचा खात्मा   |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • भारतीय सैन्य दलाची मोठी कारवाई 
  • तीन दहशतवाद्यांचा खात्मा 
  • परिसरात भारतीय सैन्य दलाचं सर्च ऑपरेशन सुरू

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय सैन्य दलाचं ऑपरेशन ऑल ऑऊट सुरू आहे. रविवारी या अभियाना अंतर्गत शोध मोहिम सुरू असताना भारतीय सैन्य दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे ज्यात म्हटले आहे की, खात्मा करण्यात आलेल्या तिन्ही दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाहीये. शोपियांमधील रेबन परिसरात या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. 

संयुक्त ऑपरेशन 

या परिसरात दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर रविवारी सकाळपासूनच दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. या शोधमोहिमेत केंद्री राखीव पोलीस दल, राष्ट्रीय रायफल्स आणि विशेष ऑपरेशन्स ग्रुपच्या १७८ बटालियनने संयुक्त कारवाई सुरू केली. ज्या ठिकाणी दहशतवादी आहेत ते ठिकाण समजताच त्या परिसराला घेरण्यात आले. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि त्या गोळीबाराला भारतीय सैन्य दलाने चोख प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

सैन्य दलाची शोधमोहीम सुरू 

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची मोहीम सैन्य दलाची सुरू आहे. भारतीय सैन्य दलाकडून होत असलेल्या या कारवाईमुळे दहशतवादी बिथरले आहेत. यामुळेच ते आता सामान्य नागरिकांना आपलं लक्ष्य करत असल्याचं दिसत आहे. शनिवारी काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. उत्तर काश्मीरमधील बोमाई परिसरात आदिपूर येथे रात्री ९.३० वाजता दहशतवाद्यांनी अशफाक अहमद नजर या २५ वर्षीय तरुणाच्या घरावर हल्ला केला. हल्ल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं मात्र, त्याचा मृत्यू झाला.

महिन्याभरात आठ दहशतवाद्यांचा खात्मा 

गेल्या महिन्यात सहा तारखेला सैन्य दलाने मोठी कारवाई करत दहशतवादी संघटना असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाज नायकू याचा खात्मा केला होता. रियाज नायकू हा दोन वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये होता. यासोबतच भारतीय सैन्य दलाने इतरही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या महिन्याभरात भारतीय सैन्याने आठ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी