Punjab Free Electricity : पंजाबमध्ये ३०० युनिट वीज मोफत, पण नियम आणि शर्ती लागू

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ३०० युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लवकरच लागू होणार आहे, परंतु त्यात अटी आणि शर्ती लागू होणार आहेत. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत काही वीजबिल माफ करण्याचा निर्णयही मान सरकारने घेतला आहे. 

bhagawant mann
भगवंत मान  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ३०० युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
  • हा निर्णय लवकरच लागू होणार आहे, परंतु त्यात अटी आणि शर्ती लागू होणार आहेत.
  • तसेच ३१ डिसेंबरपर्यंत काही वीजबिल माफ करण्याचा निर्णयही मान सरकारने घेतला आहे. 

Punjab Free Electricity : चंडीगढ : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने ३०० युनिट वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लवकरच लागू होणार आहे, परंतु त्यात अटी आणि शर्ती लागू होणार आहेत. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत काही वीजबिल माफ करण्याचा निर्णयही मान सरकारने घेतला आहे. 

पंजाबचे मुख्यमंत्रीभगवंत मान यांनी जाहीर केले आहे की कुठल्या घरात सलग दोन महिने ६०० युनिट वीज वापरल्यास त्याचे बिल भरावे लागणार आहे. तसेच अनुसूचित जाती, ओबीसी आणि दारिद्र्यरेषेखाली असलेल्या कुटुंबीयांना, स्वातंत्र्य सैनिक असलेल्या कुटुंबीयांना ६०० युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे. परंतु सलग दोन महिन्यात ६०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरल्यास त्यांना त्यावरील बिल भरावे लागणार आहे. 


या वर्गात मोडणार्‍या कुटुंबीयांना आधी २०० युनिट बिल मोफत मिळत होती. उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांसाठी वीजदर वाढवले जाणार नाही, तसेच कृषी क्षेत्रासाठी मोफत वीज असणार आहे असेही मुख्यमंत्री मान यांनी जाहीर केले आहे. राज्यातील ८० टक्के कुटुंबीयांना या निर्णयाचा फायदा होईल असा विश्वास मुख्यमंत्री भगवंत मान यांनी व्यक्त केला आहे. 

पंजाब राज्यात ७३ लाख घरगुती वीज ग्राहक आहेत अशी माहिती मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिली आहे. या निर्णयामुळे ६१ लाख लोकांना होणार आहे. राज्य सरकारने २ किलोवॅट दाब वीज ग्राहकांचे वीज बिल माफ केले आहेत. तसेच राज्यातील जनतेला मोफत आणि स्वस्त वीज देण्यासाठी ट्रान्समिशन लॉस, कोळश्याचा तुटवडा आणि कायदेशीर अडचणी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या अडचणी दूर करण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील आहे अशी मुख्यमंत्री मान म्हणाले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी