China Trade : चीनला दिलेल्या कर सवलती रद्द करणार ३२ देश

32 nations to remove China from preferential tariff treatment on December 1 चीनला दिलेल्या कर सवलती १ डिसेंबर २०२१ पासून रद्द करणार किंवा त्यात मोठ्या प्रमाणात कपात करणार अशा स्वरुपाची घोषणा जगातील ३२ देशांनी केली आहे.

32 nations to remove China from preferential tariff treatment on December 1
China चीनला दिलेल्या कर सवलती रद्द करणार ३२ देश 
थोडं पण कामाचं
  • China चीनला दिलेल्या कर सवलती रद्द करणार ३२ देश
  • कर सवलती रद्द करणार असलेल्या ३२ देशांमध्ये युरोपमधील २७ देश
  • चीनच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रतिकूल परिणाम होणार

32 nations to remove China from preferential tariff treatment on December 1 । बीजिंग: चीनला दिलेल्या कर सवलती १ डिसेंबर २०२१ पासून रद्द करणार किंवा त्यात मोठ्या प्रमाणात कपात करणार अशा स्वरुपाची घोषणा जगातील ३२ देशांनी केली आहे. आर्थिक प्रगतीची संधी मिळावी यासाठी १९७८ पासून अनेक देश चीनला कर सवलती देत आहेत. सध्या जगातील ४० पेक्षा जास्त देश चीनला मोठ्या प्रमाणावर कर सवलती देत आहेत. या देशांपैकी ३२ देशांनी चीनला दिलेल्या कर सवलती रद्द करणार किंवा त्यात मोठ्या प्रमाणात कपात करणार अशा स्वरुपाची घोषणा केली आहे. यात युरोपमधील २७ देश आहेत. यामुळे चीनच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.

मोठ्या प्रमाणावर कर सवलती मिळत असल्यामुळे चीन स्वस्त दरात अनेक प्रकारच्या वस्तूंचा विविध देशांना मोठ्या प्रमाणावर पुरवठा करत होता. कर सवलती रद्द झाल्या अथवा त्यात कपात झाली तर स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर वस्तू पुरवणे चीनला कठीण जाईल. अनेक वस्तूंच्या दरात वाढ करावी लागेल. 

चीन या देशाची वेगाने आर्थिक प्रगती सुरू आहे. चीनच्या माणशी उत्पन्नातही वाढ झाली आहे. या परिस्थितीत चीनला गरीब देशांना मिळणाऱ्या सवलतींसारख्या कर सवलती देणे योग्य नाही, असे सांगत अनेक देशांनी कर सवलती रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेचा चीनच्या अर्थव्यवस्थेवर किती प्रतिकूल परिणाम होणार याबाबत मतमतांतरे आहेत. पण ताज्या घोषणेमुळे चीनच्या आर्थिक प्रगतीचा वेग मंदावेल, अशी शक्यता हाँगकाँगमधील अनेक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. कर सवलतींचा फायदा घेण्यासाठी चीनमध्ये कारखाने उघडणाऱ्या अनेक कंपन्या पुढील काही वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने पर्यायी देशांचा विचार करण्याची शक्यता असल्याचेही हाँगकाँगमधील तज्ज्ञ म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी