३३ वर्षीय महिलेचा ११ वर्षाच्या मुलावर बलात्कार, महिलेने दिला बाळालाही जन्म 

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 20, 2019 | 03:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

एका ३३ वर्षीय महिलेने ११ वर्षाच्या मुलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढंच नव्हे तर या महिलेने ११ वर्षाच्या मुलापासून एका बाळाला देखील जन्म दिला आहे. 

33 year old woman rape on 11 year old boy in florida 
३३ वर्षीय महिलेचा ११ वर्षाच्या मुलावर बलात्कार, महिलेने दिला बाळालाही जन्म   |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • ३३ वर्षीय महिलेचा ११ वर्षीय मुलावर वारंवार बलात्कार 
  • ११ वर्षीय मुलापासून महिलेने दिला एका बाळाला जन्म
  • आरोपी महिलेला बलात्काराच्या आरोपाखाली २० वर्षाची कठोर शिक्षा

फ्लोरिडा: फ्लोरिडातील हिल्सबोरोमध्ये एक अतिशय विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एका ३३ वर्षीय महिलेला २०१४ मधील लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. या महिलेने एका ११ वर्षाच्या मुलावर तब्बल १५ वेळा बलात्कार केल्याचा आरोप होता. जो तिने नंतर मान्य देखील केला. एवढंच नव्हे तर या महिलेने फ्लोरिडातील हिल्सबोरो काउंटीमध्ये एका मुलाला देखील जन्म दिला होता. या आरोपी महिलेचं नाव मारिसा मॉरी असं आहे. महिलेने ज्या मुलावर बलात्कार केला होता. त्या पीडित मुलाचं आजमीतिला वय १७ वर्ष आहे. पण आता तो आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने आपल्या पाच वर्षाच्या मुलाचं पालन पोषण करण्याचा प्रयत्न करत आहे. 

ज्यावेळी मारिसाने ११ वर्षाच्या मुलावर वारंवार बलात्कार केला होता. त्यावेळी तिचं वय हे २८ वर्ष होतं. खरं तर ती ११ वर्षाच्या मुलासाठी नॅनीचं काम करत होती. लैंगिक अत्याचाराचा गुन्हा कबूल केल्यानंतर आणि त्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर मारिसाला कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली. रिपोर्ट्नुसार, मारिसाने याआधी देखील एका अल्पवयीन मुलाशी संबंध ठेऊन दुसऱ्या एका मुलाला जन्म दिला होता. 

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जानेवारी २०१४ मध्ये जेव्हा महिलेने ११ वर्षीय मुलासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले तेव्हा ती नॅनीचं काम करत होती. ऑक्टोबर २०१४ मध्ये मारिसाने एका मुलाला जन्म दिला. पण त्यावेळी ११ वर्षाच्या पीडित मुलाच्या पालकांना ही गोष्ट माहित नव्हती की, मारिसाने नेमकं काय केलंय. त्यामुळे पीडित मुलाच्या पालकांचं असं मत होतं की, मारिसाला तिच्या एखाद्या प्रियकरापासून मुलगा झाला आहे. 

दरम्यान, पीडित मुलाच्या आईने या प्रकरणाबाबत बोलताना असं म्हटलं की, 'या महिलेच्या वासनांध कृत्यामुळे माझ्या मुलाला त्याचं बालपण गमवावं लागलं आहे. तो एखाद्या सामन्या टीन एजर प्रमाणे आपलं आयुष्य व्यतीत करु शकला नाही. लहानपणातच एक बाप म्हणून त्याला जगावं लागलं.' मारिसने मुलाला जन्म दिल्यानंतर त्या मुलाची संपूर्ण जबाबदारी ही पीडित मुलावर आणि त्याच्या कुटुंबीयांवर टाकण्यात आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी