'या' कारणावरुन पतीने पत्नीची हत्या करुन मृतदेहाचे केले छोटे-छोटे तुकडे

Wife Murder: चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची निर्घृण हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे सेप्टिक टँकमध्ये फेकल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीतील रोहिणी येथे घडली आहे. 

37 year old tv mechanic murdered his wife and chopped her body accused husband arrested 
'या' कारणावरुन पतीने पत्नीची हत्या करुन मृतदेहाचे केले छोटे-छोटे तुकडे  |  फोटो सौजन्य: Getty Images

थोडं पण कामाचं

  • चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या
  • पत्नीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करुन फेकले टँकमध्ये 
  • पतीने स्वत: पोलीस स्थानकात जाऊन पोलिसांनी दिली हत्येची माहिती 

नवी दिल्ली: एका ३७ वर्षीय टीव्ही मॅकेनिकने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. आरोपी पतीने फक्त पत्नीची हत्याच केली नाही तर तिचे तुकडे-तुकडे करुन सेप्टिक टँकमध्ये टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना राजधानी दिल्लीतील रोहिणी येथील प्रेम नगर परिसरात घडली आहे. सूत्रांच्या महितीनुसार चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीची हत्या केली आहे. 

आरोपी पतीचा त्याच्या पत्नीवर सुरुवातीपासूनच संशय होता की, त्याच्या पत्नीचे दुसऱ्या कुणाशी तरी अनैतिक संबंध आहेत. याच संशयातून त्याने पत्नीची हत्या केली. त्यानंतर पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे-तुकडे करुन दे जवळच्या एका टाकीमध्ये फेकून दिले. त्यानंतर स्वत: आरोपी पतीनेच पोलिसात जाऊन याबाबतची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस फॉरेन्सिक टीमसहच घटनास्थळी पोहचली. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव आशू असं असून त्याच्या पत्नीचं नाव सीमा असं आहे. सुरुवातीला आशूने सीमाच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. त्यानंतर त्याने चाकूने तुकडे-तुकडे करुन सेप्टिक टँकमध्ये फेकून दिले. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी सेप्टिक टँकमधील जागा छोटी असल्याने आणि मृतदेहाचे अनेक तुकडे असल्याने मृतदेह मिळविण्यास बराच वेळ लागला. ज्या घरात सीमाची हत्या झाली ते आशूचं स्वत:चं घर आहे. पण तो आपल्या तीन मुलांसह दुसऱ्या घरात भाड्याने राहत होतं. पण काल (रविवार) तो पत्नीला काही तरी वेगळं कारण सांगून या घरात घेऊन आला होता. आशू आणि सीमा यांचं लग्न हे जवळजवळ ९ वर्षांपूर्वीच झालं होतं. 

 

 

सीमाच्या भावांनी याबाबत पोलिसांना अशी माहिती दिली की, आशूने हत्येनंतर आम्हाला फोन करुन सांगितलं की, त्याने सीमाची हत्या केली आहे. पण सुरुवातीला आम्हाला या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. दरम्यान, या भयंकर घटनेने परिसरातील लोकांना देखील मोठा धक्का बसला आहे. आशू इतक्या निर्घृण पद्धतीने आपल्याच पत्नीची हत्या करेल याबाबत कुणालाही विश्वास बसत नाही. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी