Supertech Twin Tower Demolition: भ्रष्टाचाराची माती झाली.. भारतातील ट्विन टॉवर पाडले, पाहा ऐतिहासिक Video

Noida Supertech Twin Tower Demolition: नोएडामध्ये आज (28 ऑगस्ट) दुपारी 2.30 वाजता सुपरटेकचे ट्विन टॉवर पाडण्यात आले. दिल्लीतील कुतुबमिनारपेक्षा 100 मीटर उंच या इमारती पाडण्यासाठी 3700 किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा वापर करण्यात आला होता.

3700kgs of explosives bring down noida supertech twin towers
भारतातील ट्विन टॉवर पाडले, पाहा ऐतिहासिक Video  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • नोएडातील सुपरटेकचे ट्विन दोन टॉवर पाडले
  • अवघ्या १२ सेकंदात दोन्ही टॉवर केले जमिनदोस्त
  • सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अवैध बांधकाम केलेल्या दोन्ही इमारती पाडल्या

Supertech Twin Tower Demolition: नोएडा (उत्तरप्रदेश): गेली अनेक वर्ष उत्तर प्रदेशच्या (Uttar Paradesh) नोएडामधील (Noida) ट्विन टॉवरबाबत (Twin Tower ) बराच वाद सुरु होता. या टॉवरच्या उभारणीत मोठा भ्रष्टाचार झाला होता आणि मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आलं होतं. अखेर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज (28 ऑगस्ट) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शक्तीशाली स्फोट करुन दोन्ही महाकाय इमारती या नियंत्रित पद्धतीने पाडण्यात आल्या. या पाडकामानंतर एक प्रकारे भ्रष्टाचाराला मूठमाती दिली गेल्याची चर्चा राजधानी दिल्लीत रंगली आहे. (3700kgs of explosives bring down noida supertech twin towers) 

आज दुपारी 2.30 वाजता नोएडामध्ये सुपरटेकचे ट्विन टॉवर पाडण्यात आले. या स्फोटानंतर धुराचे प्रचंड लोट उंच हवेत गेल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा 100 मीटर उंच असलेल्या या इमारती पाडण्यासाठी 3700 किलो पेक्षा जास्त स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. 

अधिक वाचा: Supertech Twin Tower Noida : भारतातील सर्वात उंच ट्विन टॉवर ७० कोटी खर्चून बांधले आणि २० कोटी खर्चून पाडणार

दरम्यान, या स्फोटानंतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. सुमारे 650 पोलीस कर्मचारी, 100 राखीव दलाचे कर्मचारी, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी तैनात होते. खबरदारी म्हणून रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पाण्याचे टँकर देखील घटनास्थळी तैनात होते. एमराल्ड कोर्ट सोसायटी कॉम्प्लेक्सच्या मधोमध असलेले हे बांधकाम नियमांचे उल्लंघन असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. ज्यानंतर हे बांधकाम पाडण्यात आले.

नोएडाच्या सीईओ रितू माहेश्वरी यांनी सांगितले की, 'शेजारच्या गृहनिर्माण सोसायट्यांचे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. फक्त काही मातीचे ढिग हे रस्त्यावर आले आहेत. आम्हाला एका तासात परिस्थितीची चांगली कल्पना येईल.'

अधिक वाचा: Supertech Insolvency | रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीची कंपनी सुपरटेक दिवाळखोरीत...20,000 ग्राहकांवर टांगती तलवार!

'अवैध बांधकाम खपवून घेणार नाही'

सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडल्यानंतर उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश कुमार अवस्थी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने कठोर कारवाई करून हे बेकायदेशीर ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश दिले होते. यातून राज्यात अवैध बांधकाम खपवून घेतले जाणार नाही, असा संदेश जाईल.

अधिक वाचा: Twin towers: भारतात आज होणार सर्वात मोठा धमाका, 9 सेकंदात कोसळणार गगनचुंबी इमारत

इमारत नेमकी कोणी पाडली?

आयआयडीसीने माहिती दिली की, दोन महाकाय इमारती पाडण्यासाठी मुंबईच्या मे. Edifice Engineering एजन्सीची निवड करण्यात आली होती. एजन्सीने यापूर्वी कोचीनमध्ये अशीच एक गगनचुंबी इमारतीचा यशस्वीपणे जमीनदोस्त केली होती. इमारत पाडण्यासाठी वॉटर फॉल इम्प्लोशन तंत्राचा वापर करण्यात आला होता. जे डिझाईननुसार इच्छित दिशेने इमारत पाडण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. 

10 एप्रिल रोजी चाचणी स्फोट देखील घेण्यात आला होता. ज्यानंतर याच आधारे CBRI ने सुधारित स्फोट डिझाइन तयार केलं होतं. टॉवर पाडण्यासाठी सुमारे 3700 किलो स्फोटक साहित्याचा साठा करण्यात आला होता. दोन्ही टॉवर्समध्ये 9600 छिद्रे करण्यात आली होती आणि त्यातच स्फोटके भरण्यात आली होती. 28 ऑगस्ट रोजी दुपारी ठीक 02.30 वाजता, 30 मजली टॉवर क्रमांक 16 आणि 31 मजली टॉवर क्रमांक 17 बटण दाबल्यानंतर अवघ्या 12 सेकंदात जमिनदोस्त झाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी