तरुणाचं अपहरण करुन 4 तरुणींनी केला सामूहिक बलात्कार, तरुणाच्या दाव्याने खळबळ

Crime News: एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने दावा केला आहे की, चार तरुणींनी त्याचं अपहरण करुन त्याच्यासोबत रात्रभर शारीरिक संबंध ठेवले.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो (Photo: iStock) 
थोडं पण कामाचं
  • पंजाबमधील जालंधर येथून समोर आली धक्कादायक घटना
  • एका तरुणाचं चार तरुणींनी अपहरण केल्याचा आरोप
  • अपहरण करुन चार तरुणींनी सामूहिक बलात्कार केल्याचा तरुणाचा आरोप

Punjab News: पंजाबमधील जालंधर येथून एक विचित्र आणि धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे. येथील एका फॅक्ट्रीत काम करणाऱ्या तरुणाने दावा केला आहे की, रविवारी रात्रीच्या सुमारास चार तरुणींनी त्याचं अपहरण केलं. त्यानंतर त्याला अज्ञातस्थळी नेण्यात आलं आणि तेथे त्याच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर या तरुणींनी त्या तरुणाला त्याच ठिकाणी टाकून घटनास्थळावरुन पळ काढला.

या तरुणाने मीडियासमोर संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला. मात्र, या प्रकरणात अद्याप या तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाहीये. असे असले तरी, माध्यमांतून हा प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे.

हे पण वाचा : काळ्या मिरीचे हे उपाय करतील तुम्हाला गडगंज श्रीमंत

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाने दावा केला आहे की, जालंधर येथील लेदर कॉम्प्लेक्स रोडवर रविवारी रात्रीच्या सुमारास एका कारमधून चार मुली आल्या. या मुलींनी फॅक्ट्रीत काम करुन आपल्या घराकडे निघालेल्या तरुणाचं अपहरण केलं. त्याननंतर या तरुणी त्याला घेऊन अज्ञातस्थळी गेल्या. त्या ठिकाणी सर्व मुलींनी मिळून या तरुणावर सामूहिक बलात्कार केला. या तरुणाने सांगितले की, रात्रीच्या सुमारास कामावरुन तो घरी चालत जात होता आणि त्याचवेळी ही घटना घडली.

हे पण वाचा : थंडीमुळे खरंच दात खराब होऊ शकतात का? वाचा

पीडित तरुणाने सांगितले की, रस्त्याने चालत जात असताना माझ्या समोर एक कार येऊन थांबली. या गाडीत चार मुली होत्या त्यांनी आधी मला एक पत्ता विचारला. मी त्यांना तो पत्ता सांगत होतो तितक्यात त्यांनी माझ्या नाकाजवळ एक कपडा आणला आणि मी बेशुद्ध झालो. त्यानंतर मला घेऊन त्या मुली अज्ञातस्थळी गेल्या. या तरुणाने सांगितले की, चारही तरुणी या 22 ते 23 वयोगटातील होत्या. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा त्याच्या अंगावर कपडे सुद्धा नव्हते आणि एका दोरीने त्याला बांधले होते.

हे पण वाचा : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असाल या गोष्टींची घ्या काळजी

या तरुणाने सांगितले की, सर्व मुली त्याच्यासोबत अनेक तास जबरदस्ती करत होत्या. जवळपास 11 ते 12 तास त्यांनी मला त्रास दिला. त्यानंतर त्यांनी मला त्या अज्ञातस्थळावर सोडून पहाटेच्या सुमारास तेथून त्या निघून केल्या. या प्रकरणी पोलीस अधिकारी गगनदीप सिंह सेखों यांनी सांगितले की, अद्याप कोणीही तक्रार दाखल केलेली नाहीये आणि तक्रार दाखल झाली तर तपास नक्की होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी