पुणे जिल्ह्यातील चार जणांचा उत्तरप्रदेशमध्ये मृत्यू

4 persons from Pune district die in Uttar Pradesh : अपघातात मृत्यू झालेल्या पाच पैकी चौघेजण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात एक्सप्रेस वे वरील ४० किमी माइलस्टोन जवळ झाला आहे. तर अपघातात दोन ते तीन प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

4 persons from Pune district die in Uttar Pradesh
पुणे जिल्ह्यातील चार जणांचा उत्तरप्रदेशमध्ये मृत्यू   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आग्र्याहून नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो आणि डम्पर यांच्यात जोरदार धडक
  • अपघातात पुणे जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू
  • अपघात इतका भीषण होता की, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला

आग्रा  : आग्र्याहून नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो आणि डम्पर यांच्यात जोरदार धडक (Bollero and dumper collied each other) झाल्याने घडल्लेया या विचित्र अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर अपघात हा उत्तरप्रदेश राज्यातील यमुना एक्सप्रेस वे वर हा अपघात झाला आहे. बोलेरो आणि डम्पर यांच्यात धडक (Bollero and dumper collied each other) झाल्याने हा अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की यामध्ये, बोलेरो गाडीचा चक्काचूर झाल्याचं पहायला मिळत आहे. आग्र्याहून नोएडाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी सकाळच्या सुमारास हा विचित्र अपघात घडला आहे. अपघात इतका भीषण होता की, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाश्यावर जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, यामध्ये काही प्रवाश्यांची प्रकृती गंभीर असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा : पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

अपघातात मृत्यू झालेल्या पाच पैकी चौघेजण हे महाराष्ट्रातील

दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या पाच पैकी चौघेजण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात एक्सप्रेस वे वरील ४० किमी माइलस्टोन जवळ झाला आहे. तर अपघातात दोन ते तीन प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा ; वाढत्या वजनाने आहात त्रस्त तर डाएटमध्ये सामील करा लसूण-मध

अशी आहेत अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे?

१ ) स्वर्णा चंद्रकांत बुराडे - बारामती, पुणे ( वय ५९ वर्षे )

२ ) रंजना भरत पवार - मराठा नगर, बारामती, पुणे ( वय ६० वर्षे )

३ ) मालन विश्वनाथ कुंभार - बारामती, पुणे ( वय ६३ वर्षे )

४ ) चंद्रकांत नारायण बुराडे - बारामती, पुणे ( वय ६८ वर्षे )

५ ) नुवंजन मुजावर -  बेळगाव, चिकोडी कर्नाटक ( वय ५३ वर्षे )

अधिक वाचा ; Skin Care: मानेचा रंग काळा पडतोय तर या ३ उपायांनी करा दूर 

अशी आहेत जखमी झालेल्या व्यक्तींची नावे

१ ) सुनीता राजू गस्ते – बेळगाव ( वय ३५ वर्षे )

३ ) नारायण रामचंद्र कोळेकर - फलटण, सातारा ( वय ४० वर्षे )

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी