Terrorist caught from Karnal: करनाल (Karnal) पोलिसांनी (police) मोठी कारवाई करत चार संशयित दहशतवाद्यांना (terrorists) (terrorists) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून पोलीस पथकाने शस्त्रेही जप्त केली आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडून मोठा शस्त्रसाठा आणि गनपावडरचा कंटनेरही जप्त केला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता केंद्रीय (central ) यंत्रणाही या प्रकरणाची चौकशी करू शकतात.
संशयितांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गोळ्या आणि गनपावडरचे कंटेनरही जप्त केले आहेत. कंटेनरमधून जप्त केलेला पदार्थ आरडीएक्स असू शकतो, असेपोलिसांचे म्हणणे आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटेलिजन्स ब्युरोला (आयबी) याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. यावर कारवाई करत पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी मिळून बस्तारा टोल प्लाझाजवळ नाका लावून एक वाहन तपासणीसाठी अडवले. गाडीची झडती घेतली असता हे घातक वस्तू पोलिसांच्या हाती लागलं.
या संपूर्ण प्रकरणाच्या तपासादरम्यान बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आले आहे. दहशतवाद्यांना पकडल्यानंतर हे लोक काही मोठी घटना घडवण्यासाठी निघाले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस आणि प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.