कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले, गेल्या २४ तासात ५२४ पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू 

corona positive patients: देशात मागील २४ तासात ५२४ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ४४,४८९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ९२,६६,७०६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

corona patients
कोरोना रुग्ण संख्या  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ
  • देशात आता कोरोना रुग्णांची संख्या ९२ लाखांच्यावर 
  • गेल्या २४ तासात देशात ५२४ रुग्णांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases 26 November 2020: गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे हजारो रुग्ण वाढले आहेत. देशात मागील २४ तासात कोरोनाचे तब्बल ४४,४८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. (Positive Patient)  याशिवाय देशात गेल्या २४ तासात ५२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Corona Patient Death) सध्या देशभरात ४ लाख ५२ हजार अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients)आहेत. 

आतापर्यंत देशात एकूण १ लाख ३५ हजाराहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ९२ लाखांच्या देखील पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण ९२,६६,७०६ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी १,३५,२२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

देशात आतापर्यंत ८६,७९,१३८ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या ४,५२,३४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण:

S. No. Name of State/UT Active Cases* Discharged* Deaths*
1 Andaman and Nicobar Islands 137 4479 61
2 Andhra Pradesh 12673 845039 6962
3 Arunachal Pradesh 968 15157 49
4 Assam 3277 207766 978
5 Bihar 5225 225077 1237
6 Chandigarh 1127 15532 266
7 Chhattisgarh 24676 201744 2783
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 35 3290 2
9 Delhi 38287 498780 8720
10 Goa 1281 45229 683
11 Gujarat 14287 183756 3906
12 Haryana 20948 201250 2291
13 Himachal Pradesh 7875 28106 585
14 Jammu and Kashmir 5264 100892 1663
15 Jharkhand 2160 105040 958
16 Karnataka 24909 841432 11714
17 Kerala 65234 511008 2121
18 Ladakh 886 7125 108
19 Madhya Pradesh 13742 181345 3197
20 Maharashtra 85488 1663723 46748
21 Manipur 3248 20640 245
22 Meghalaya 915 10488 110
23 Mizoram 441 3319 5
24 Nagaland 1467 9463 61
25 Odisha 6212 308102 1687
26 Puducherry 540 35671 609
27 Punjab 7129 136622 4684
28 Rajasthan 26320 225229 2218
29 Sikkim 236 4481 102
30 Tamil Nadu 11520 751535 11655
31 Telengana 10784 254676 1444
32 Tripura 767 31441 370
33 Uttarakhand 4658 66799 1185
34 Uttar Pradesh 24876 500835 7644
35 West Bengal 24752 434067 8172
Total# 452344 8679138 135223

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात मागील २४ तासात ६,१५९ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १७,९५,९५९
एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात ४,८४४ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १६,६३,७२३ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

राज्यात एकूण ८५,४८८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, काल एका दिवसात ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४६,७४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी