Trending news: अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसून येत आहेत. वेळोवेळी अशा प्रकारच्या बातम्याही समोर येताना दिसून येतात. अनेकवेळा लहान मुलांचा गैरफायदा घेत किंवा त्यांना एखाद्या गोष्टीचं आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आता अशाच प्रकारची एक घटना ऑस्ट्रेलियातून समोर आली आहे. येथील एका करोडपती महिलेने १४ वर्षीय मुलासोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर त्या मुलाला गप्प बसण्याची धमकीही या महिलेने दिली. (45 year old business woman made sexually assault in australia)
हे प्रकरण उघडकीस आल्यावर पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. मात्र, त्यानंतर या महिलेला जामीन मिळाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून सर्वत्र या गोष्टीची जोरदार चर्चा होतानाही दिसून येत आहे.
अधिक वाचा : Fraud marriage : लग्नाचं अमिष दाखवून सहा तरुणींना गंडा, सातवीनं घडवली अद्दल
रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध हॉर्स ब्रीडर रॉस डेजली यांची मुलगी सवाना डेजली (४५) हिने एका १४ वर्षीय मुलासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सवानाला अटक करण्यात आली होती. २७ जून रोजी तिला अटक करण्यात आली आणि कारागृहात रवानगी केली. २५ जुलै रोजी तिला डाऊनिंग सेंटर लोकल कोर्ट (सिडनी ऑस्ट्रेलिया) येथे हजर करण्यात आले. सवानाचे वकील गॅब्रिएल बशीर यांनी कोर्टाकडे सवानाच्या जामीनाची मागणी केली.
अधिक वाचा : Monkeypox पासून बचाव करायचाय मग फिजिकल रिलेशन दरम्यान चुकूनही करू नका ही चूक, WHO ने दिला सल्ला
यावेळी दोन्ही बाजुच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. सवाना एक व्यावसायिक आहे आणि तुरुंगात रहावे लागत असल्यामुळे तिला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच सवानाची मानसिक स्थितीही बिघडत चालली आहे. असे सांगत सवानाला जामीन देण्याची मागणी करण्यात आली.
इतकेच नाही तर सवानाची आई कॅन्सर पीडित असल्याचा मुद्दाही कोर्टात मांडण्यात आला. सवानाच्या वकीलांनी बिझनेसच्या दृष्टीने म्हटलं की, सवाना आपल्या कंपनीचे नवे प्रोडक्ट्स आणि रिब्रँडिंगचं काम करते. जेलमध्ये असल्याने पूर्ण बिझनेस ठप्प आहे.
तर, पोलिसांनी कोर्टात सर्व पुरावे सादर केले आणि सवानाने जाणून-बुजून या मुलासोबत गैरकृत्य केल्याचं म्हटलं. इतकेच नाही तर या अल्पवयीन मुलाला धमकवल्याचा पुरावाही पोलिसांनी कोर्टात सादर केला. यावेळी सवानाने कोर्टात सांगितले होते की, अल्पवयीन मुलाच्या सहमतीने मी त्याच्यासोबत संबंध ठेवले पण नंतर ते चुकीचं ठरलं. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यावर कोर्टाने सवानाला ७९ लाख रुपयांच्या जामीनावर जामीन दिला.