Pakistan News | नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे ४९ वर्षीय खासदार आमिर लियाकत यांचे तिसरे लग्नही धोक्यात आले आहे. आमिर यांची १८ वर्षीय पत्नी सय्यदा दानिया हिने आमिर लियाकतवर गंभीर आरोप केले आणि पतीकडून घटस्फोट घेण्याचे जाहीर केले. दोघांनीही तीन महिन्यांपूर्वी ९ फेब्रुवारीला लग्न केले होते. घटस्फोटाची घोषणा करण्यासोबतच सय्यदाने पतीवर गंभीर आरोपही केले आहेत. (49-year-old Pakistani MP's third marriage breaks up).
अधिक वाचा : ब्रह्मवैवर्त पुराणातील या गोष्टींनी मान-सन्मान वाढेल
आमिर हे पाकिस्तानातील प्रसिद्ध टीव्ही होस्ट देखील आहेत ज्यांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. घटस्फोटासाठी अर्ज दाखल करताना, दानियाने आमिर लियाकतवर गंभीर आरोप केले आणि सांगितले की, त्याचे वागणे आमिर टीव्हीवर जो दिसतो त्याच्या अगदी विरुद्ध आहे. तो सैतानापेक्षा वाईट आहे. न्यायालयाने या घटस्फोट प्रकरणाची सुनावणी ७ जून रोजी निश्चित केली आहे. घटस्फोटात दानियाने अनेक कोटी पाकिस्तानी रुपये, घर आणि दागिन्यांची मागणी केली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना दानियाने म्हटले की, "याने माझ्यावर खूप अत्याचार केले आहेत. त्याने मला काही दिवस खोलीत कोंडून ठेवले. जेवण वेळेवर दिले नाही, रात्रभर जागे राहायचे. मी लहान आहे, माझे हे सहन करण्याचे वय देखील नाही. नोकर किंवा माध्यमांची छोटीशी जरी चर्चा केली की त्याला वाईट वाटायचे आणि तो माझ्याशी वाद घालायचा. यामध्ये मला गोळ्या घालण्याची धमकीही दिली. तसेच माझा गळा देखील दाबला. मी खूप सहन केले, मला वाटले की मला कोणत्यातरी गुन्ह्याची शिक्षा होत आहे आणि मी कोणत्यातरी अडचणीत सापडली आहे. यामुळे मला खूप राग आला. उद्या मला, माझ्या भावाला किंवा माझ्या कुटुंबाला काही झालं तर त्याला आमीर लियाकत जबाबदार असेल."
दरम्यान, आमिर लियाकतनेही इंन्स्टाग्रामवर उघडपणे स्वतःचा बचाव केला असून काही व्हिडिओ आणि पोस्ट केल्या आहेत. आमिरने दुसऱ्या मुलासोबतचा दानियाचा फोटोही टाकला असून त्यात दानियाचा काही ऑडिओही आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये वरील त्यांनी लिहिले की, "तिच्या निरागसतेकडे पाहण्यापूर्वी तिचा खरा चेहरा पाहा."