चिंता वाढली... रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ

corona positive patients: देशात मागील २४ तासात ५१७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ४९,८८१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ८०,४०,२०३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

corona patients
कोरोना रुग्ण संख्या  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ
  • देशात आता कोरोना रुग्णांची संख्या ८० लाखांच्यावर 
  • गेल्या २४ तासात ५१७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases today: देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. रुग्णांचा आणि मृतांचा आकडा पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता देखील वाढली आहे. गेल्या २४ तासात देशात ४९,८८१ नवे रुग्ण (Positive Patient) आढळून आले आहेत. तसेच गेल्या २४ तासात देशात ५१७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Corona Patient Death) देशात सध्या ६ लाख ०३ हजार अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients)आहेत. 

आतापर्यंत देशात एकूण १ लाख २० हजाराहून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ८० लाखांच्या देखील पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण ८०,४०,२०३ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी १,२०,५२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

देशात आतापर्यंत ७३,१५,९८९ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या ६,०३,६८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण:

S. No. Name of State/UT Active Cases* Discharged* Deaths*
1 Andaman and Nicobar Islands 192 4039 58
2 Andhra Pradesh 26622 781509 6643
3 Arunachal Pradesh 2064 12480 36
4 Assam 11803 192517 917
5 Bihar 8329 204178 1069
6 Chandigarh 629 13359 224
7 Chhattisgarh 22167 157480 1936
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 51 3184 2
9 Delhi 29378 334240 6396
10 Goa 2402 39974 592
11 Gujarat 13332 152858 3701
12 Haryana 11014 149451 1758
13 Himachal Pradesh 2646 18203 300
14 Jammu and Kashmir 6976 84782 1455
15 Jharkhand 5363 94326 880
16 Karnataka 68180 733558 11046
17 Kerala 93369 316692 1403
18 Ladakh 642 5369 74
19 Madhya Pradesh 10094 156264 2913
20 Maharashtra 130286 1486926 43554
21 Manipur 4233 13420 156
22 Meghalaya 1364 7777 85
23 Mizoram 417 2238 1
24 Nagaland 1845 6945 34
25 Odisha 14068 270130 1284
26 Puducherry 3686 30307 590
27 Punjab 4239 123866 4158
28 Rajasthan 15708 174044 1877
29 Sikkim 263 3545 67
30 Tamil Nadu 26356 679377 11018
31 Telengana 17979 216353 1324
32 Tripura 1696 28525 345
33 Uttarakhand 3696 56556 1009
34 Uttar Pradesh 25487 443589 6958
35 West Bengal 37111 317928 6664
Total# 603687 7315989 120527
 

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात मागील २४ तासात ६,७३८ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १६,६०,७६६ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात ८,४३० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १४,८६,९२६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. 

राज्यात एकूण १,३०,२८६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, काल एका दिवसात ९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४३,५५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी