रायपूर इथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू, चार जण प्राणवायूच्या अभावामुळे मृत्यूमुखी

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 18, 2021 | 12:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

छत्तीसगढची राजधानी असलेल्या रायपूर इथे एका रुग्णालयात आग लागल्याची घटना समोर येत आहे. या अग्निकांडात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 4 जणांचा मृत्यू हा प्राणवायूच्या कमतरतेमुळे झाल्याची माहिती मिळत आहे.

Raipur hospital fire
रायपूर इथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू, चार जण प्राणवायूच्या अभावामुळे मृत्यूमुखी  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • अतिदक्षता विभागात शॉर्टसर्किटमुळे आग
  • इतर 4 रुग्णांचा मृत्यू प्राणवायूच्या पुरवठ्याअभावी
  • राहुल गांधी यांनी ट्वीट करून व्यक्त केले दुःख

रायपूर: देशभरात एकीकडे कोरोनाच्या संकटाच्या (Corona pandemic) दुसऱ्या लाटेचा (second wave) कहर सुरू असतानाच छत्तीसगढची (Chhattisgarh) राजधानी (capital) रायपूर (Raipur) इथे एका रुग्णालयाला (hospital) आग (fire) लागल्याची घटना समोर येत आहे. या आगीत 5 जण मृत्यूमुखी (dead) पडले आहेत. रायपूरच्या पचेडी नाक्याजवळच्या (Pachedi Naka) राजधानी रुग्णालयात (Rajdhani hospital) ही घटना घडली आहे. इथे कोरोनाबाधित (corona patients) असलेले काही रुग्णही दाखल होते.

अतिदक्षता विभागात शॉर्टसर्किटमुळे आग

या रुग्णालयात जवळपास 50 रुग्णांवर उपचार सुरू होते. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. इथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे.

इतर 4 रुग्णांचा मृत्यू प्राणवायूच्या पुरवठ्याअभावी

या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या 5 जणांपैकी फक्त एकाचा मृत्यू प्रत्यक्ष आगीमुळे झाला आहे तर उर्वरित चौघांचा मृत्यू हा प्राणवायूचा पुरवठा बंद झाल्यामुळे झाल्याचे समोर येत आहे. आग लागल्याने हा प्राणवायूचा पुरवठा बंद पडला.

राहुल गांधी यांनी ट्वीट करून व्यक्त केले दुःख

रायपूरमधील घटनेबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की ही घटना दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीय आणि प्रियजनांप्रति त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच या अवघड काळात मृतांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आवाहनही त्यांनी छत्तीसगढ सरकारला केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी