५ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन विहिरीत फेकलं

Minor raped and thrown into Well: एका पाच वर्षीय मुलीवर बालात्कार करुन तिला विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी तिची मदत करुन बाहेर काढलं. 

5 year old girl raped and thrown into well in koriya of Chhattisgarh
प्रातिनिधीक फोटो 

थोडं पण कामाचं

  • पीडित मुलीच्या अंगावर जखमा आणि चावल्याच्या जखमा असल्याचं आढळून आलं आहे
  • घाबरून आरोपीने पीडित मुलीच्या चुलत भावाची गळा आवळून केली हत्या 
  • आरोपीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे

रायपूर: छत्तीसगढमधील (Chhattisgarh) कोरिया जिल्ह्यात (Koriya District) एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार (rape) करुन तिला विहिरीत (Well) फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीला विहिरीत फेकल्याने ती जखमी झाली आहे, तिच्या रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी तिला बचावले आहे.

आरोपी अटकेत

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीने सर्वप्रथम पीडित मुलीच्या सहा वर्षीय चुलत भावाची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर ५ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिला विहिरीत ढकलले. पीडित मुलीच्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. 

पीडित मुलीच्या अंगावर चावण्याच्या जखमा

विहिरीत फेकल्याने पीडित मुलीच्या अंगावर जखमा झाल्या आहेत. तसेच पीडित मुलीच्या अंगावर चावल्याच्या सुद्धा जखमा असल्याचं समोर आलं आहे. या जखमा पाहून पोलिसांनाही धक्का बसला. आरोपी हा शेजारी गावात राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कोरिया जिल्ह्यातील मनेंद्रगढ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात पीडित मुलगी राहते. पीडित मुलगी आपल्या सहा वर्षीय चुलत भावासोबत शेतात खेळत होती. त्यावेळी शेजारील गावात राहणारा आरोपी तरुण तेथे पोहोचला आणि झाडाची पाने तोडण्यासाठी मदत मागण्यास सुरूवात केली. यावेळी त्या मुलांनी त्याला मदत कऱण्यास होकार दिला. मग, आरोपीने पीडित मुलीला आणि तिच्या भावाला शेतापासून दोन किलोमीटर अंतरावर नेलं. यानंतर आरोपीने सहा वर्षीय मुलाचा गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केला. मग तिला विहिरीत ढकलून दिले.

आरोपीने गुन्हा केला कबूल

पीडित मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून विहिरी जवळून जाणाऱ्या ग्रामस्थांनी विहिरीच्या जवळ येत पाहिले असता लहान मुलगी आढळून आली. यानंतर ग्रामस्थांनी पीडित मुलीला विहिरीतून बाहेर काढले. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी