धक्कादायक, 50 गुंडांच्या टोळक्याने केले महिला डॉक्टरचे अपहरण, डॉक्टरच्या कुटुंबावर हल्ला

50 goons kidnap woman doctor from her home in Telangana's Ranga Reddy, attack family, WATCH VIDEO : एका धक्कादायक घटनेत 50 गुंडांच्या टोळक्याने 24 वर्षांच्या महिला डॉक्टरचे अपहरण केले. डॉक्टरच्या कुटुंबावर गुंडांनी हल्ला केला.

50 goons kidnap woman doctor from her home
धक्कादायक, 50 गुंडांच्या टोळक्याने केले महिला डॉक्टरचे अपहरण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • धक्कादायक, 50 गुंडांच्या टोळक्याने केले महिला डॉक्टरचे अपहरण
  • 24 वर्षांच्या महिला डॉक्टरचे अपहरण, डॉक्टरच्या कुटुंबावर हल्ला
  • पोलीस तपास सुरू

50 goons kidnap woman doctor from her home in Telangana's Ranga Reddy, attack family, WATCH VIDEO : एका धक्कादायक घटनेत 50 गुंडांच्या टोळक्याने 24 वर्षांच्या महिला डॉक्टरचे अपहरण केले. डॉक्टरच्या कुटुंबावर गुंडांनी हल्ला केला. घराची तोडफोड केली. घरातल्या सदस्यांना बेदम मारहाण केली. 

ज्या डॉक्टरचे अपहरण झाले तिचे नाव वैशाली आहे. गुंडांनी डॉक्टरचे अपहरण केल्याची घटना परिसरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. ही धक्कादायक घटना तेलंगणातील राचकोंडा पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आदिबातला परिसरातील आहे. पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत. 

सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने गुंडांची ओळख पटवून त्यांना शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आली आहे. शहराची पोलीस यंत्रणा खबऱ्यांच्या नेटवर्कच्या मदतीने गुंडांना शोधत आहे. 

पोलिसांचे एक पथक डॉक्टर वैशाली यांच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलून अपहरण प्रकरणात काही धागेदोरे मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. 

डॉक्टर वैशाली यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, गुंडांची टोळी जबरदस्तीने घरात घुसली. तोडफोड करत आणि मारहाण करत गुंडांनी दहशत निर्माण केली. डॉक्टर वैशाली यांना जबरदस्तीने एका कारमध्ये बसवून कुठे तरी नेले.  

लग्नसमारंभात गॅस सिलिंडरचा स्फोट; वराचे आई-वडील, बहिणीसह 60 जण होरपळले , 5 जणांचा मृत्यू

Gujarat Election Result: मोरबीत भाजप उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकला, पूल दुर्घटनेनंतरही कसा झाला विजय? वाचा

गुंडांना डॉक्टर वैशाली यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण गुंडांच्या टोळक्यापुढे डॉक्टर वैशाली यांचे प्रयत्न अपुरे पडले. सध्या डॉक्टर वैशाली कुठे आहेत याविषयी पोलीस आणि डॉक्टर वैशाली यांच्या कुटुंबातील सदस्य यापैकी कोणाकडेही माहिती उपलब्ध नाही. पोलीस डॉक्टर वैशाली यांचा शोध घेत आहेत. 

प्रकरण अतिशय गंभीर आहे. यामुळे तातडीने तपास सुरू केला आहे. डॉक्टर वैशाली यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी