राम मंदिराचे काम कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण होणार, तारीख ठरली; वेगाने काम सुरू

50 percent construction done, Ayodhya ram mandir to open for devotees in Jan 2024 : अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभारण्याचे काम वेग घेत आहे. मंदिराचे काम 2024 च्या मकरसंक्रांतीपर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.

50 percent construction done, Ayodhya ram mandir to open for devotees in Jan 2024
राम मंदिराचे काम कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण होणार, तारीख ठरली; वेगाने काम सुरू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • राम मंदिराचे काम कोणत्या दिवसापर्यंत पूर्ण होणार, तारीख ठरली; वेगाने काम सुरू
  • मंदिराच्या निर्मितीत लोखंडाचा वापर न करण्याचा निर्णय
  • मंदिरात 12 दरवाजे आणि 392 स्तंभ

50 percent construction done, Ayodhya ram mandir to open for devotees in Jan 2024 : अयोध्येत रामाचे भव्य मंदिर उभारण्याचे काम वेग घेत आहे. मंदिराचे काम 2024 च्या मकरसंक्रांतीपर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. भाविकांसाठी मंदिर 2024 च्या मकरसंक्रांतीच्या दिवसापासून खुले केले जाईल. 

मंदिराच्या निर्मितीत लोखंडाचा वापर न करण्याचा निर्णय

मंदिराच्या निर्मितीत लोखंडाचा वापर करायचा नाही असा निर्णय आधीच झाला आहे. या निर्णयानुसार काम सुरू आहे. आतापर्यंत मंदिराचे 50 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. दगडाचा वापर करून तयार केले जात असलेले हे मंदिर भूकंपाच्या मोठ्या धक्क्यांना सहन करण्यास सक्षम आहे. किमान एक हजार वर्षे सुरक्षित आणि सुस्थितीत राहील असा विचार करून मंदिराचे बांधकाम केले जात आहे.

युनिलिव्हरला ग्रहण !, Dove आणि Tresemme Shampoo मुळे कॅन्सरचा धोका

Diwali 2022: या बँकांमध्ये मिळतायेत स्वस्त व्याजदरात कर्जे...पाहा जबरदस्त ऑफर्स

मंदिरात 12 दरवाजे आणि 392 स्तंभ

मंदिरात 12 दरवाजे आणि 392 स्तंभ आहेत. जिथे आवश्यकता आहे अशा निवडक ठिकाणी मंदिरात तांब्याचा वापर करण्यात आला आहे. मुख्य मंदिर 350 बाय 250 फूट आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात 160 स्तंभ आहेत. यातील 82 स्तंभ पहिल्या मजल्यावर आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी 12 दरवाजे आहेत. या दरवाजांची निर्मिती सागवान लाकडाचा वापर करून केली आहे. 

मंदिर 2.7 एकर भूभागावर

मंदिर 2.7 एकर भूभागावर पसरले आहे. हा संपूर्ण परिसर राजस्थानमधील ग्रॅनाईट या कठीण दगडाचा वापर करुन सजविण्याचे काम सुरू आहे. ठिकठिकाणी फुलझाडे, सावली देणारे वृक्ष यांच्या माध्यमातून परिसर आणखी सजविण्याचे काम सुरू आहे. राम मंदिरात रामलल्ला यांच्या मूर्तीवर सूर्यकिरण पडतील अशी मंदिराची रचना आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी