इस्रायलमध्ये 4पेक्षा कमी वर्षांत 5वी सार्वत्रिक निवडणूक, मोदींचे मित्र PM होण्याची शक्यता

इस्रायलमध्ये 4पेक्षा कमी वर्षांत 5वी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यंदाच्या निवडणुकीअंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आणि इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (73) पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे.

5th general election in less than 4 years in Israel, Modi friend likely to become PM
इस्रायलमध्ये 4पेक्षा कमी वर्षांत 5वी सार्वत्रिक निवडणूक  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • इस्रायलमध्ये 4पेक्षा कमी वर्षांत 5वी सार्वत्रिक निवडणूक
  • मोदींचे मित्र PM होण्याची शक्यता
  • बेंजामिन नेतन्याहू (73) हे इस्रायलमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान पद हाताळणारे नेते

5th general election in less than 4 years in Israel, Modi friend likely to become PM : इस्रायलमध्ये 4पेक्षा कमी वर्षांत 5वी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यंदाच्या निवडणुकीअंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र आणि इस्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (73) पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे.

संविधानातील तरतुदीनुसार इस्रायलमध्ये 120 सदस्यांच्या संसदेत किमान 61 लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळवून सत्ता स्थापन करता येते. पण इस्रायलमध्ये 1988 पासून आतापर्यंत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. प्रत्येकवेळी एकपेक्षा जास्त पक्षांना एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी लागली. विशेष म्हणजे 1988 पासून आतापर्यंत कोणत्याही एका सरकारला 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणे शक्य झालेले नाही. प्रत्येकवेळी राजकीय कारणांमुळे सत्तांतर होत राहिले अथवा लवकर निवडणुका घेऊन नव्या सरकारची स्थापना करावी लागली. 

पुण्याच्या रुपी बॅंकेला दणका! बॅंकेचे लायसन्स रद्दच राहणार, अर्थमंत्रालयाचा निर्णय

तुमच्या डिमॅट खात्यातही होऊ शकते फसवणूक, मोहात पडून करू नका हे काम

बेंजामिन नेतन्याहू (73) हे इस्रायलमध्ये सर्वाधिक काळ पंतप्रधान पद हाताळणारे नेते आहेत. ते लिकुड पार्टीचे अध्यक्ष तसेच 1996 ते 1999 आणि 2009 ते 2021 या काळात इस्रायलचे पंतप्रधान होते. आता पुन्हा एकदा ते पंतप्रधान पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 

इस्रायलची एकूण लोकसंख्या 93.6 लाख आहे. यापैकी 67.8 लाख नागरिक मतदानासाठी पात्र आहेत. या वेळच्या निवडणुकीत 2 लाख 10 हजार 720 नवे मतदार सहभागी होत आहेत. 

यंदाच्या निवडणुकीत इस्रायलमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजेपर्यंत 40 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. इस्रायलमध्ये 1999 नंतर आतापर्यंत झालेले हे सर्वाधिक मतदान आहे. यामुळे वेळ संपेपर्यंत विक्रमी मतदान होईल अशी चिन्ह आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी