2022 Russian invasion of Ukraine : युक्रेनमध्ये एका शाळेवर एअर स्ट्राईक, ६० जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज

युक्रेनच्या पूर्व भागात लुहान्स्कमध्ये एका शाळेवर रशियाने एअरस्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लुहान्क्स भागाचे राज्यपाल सर्गेही गदाई यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 2022 Russian invasion of Ukraine

airstrike on Ukraine school
रशियाचा युक्रेनमधील शाळेवर एअर स्ट्राईक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • युक्रेनच्या पूर्व भागात लुहान्स्कमध्ये एका शाळेवर रशियाने एअरस्ट्राईक केला आहे.
  • या हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
  • लुहान्क्स भागाचे राज्यपाल सर्गेही गदाई यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 2022 Russian invasion of Ukraine :नवी दिल्ली : युक्रेनच्या पूर्व भागात लुहान्स्कमध्ये एका शाळेवर रशियाने एअरस्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लुहान्क्स भागाचे राज्यपाल सर्गेही गदाई यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रशियाने शनिवारी या भागात एअरस्ट्राईक केल्याचे त्यांनी सांगितले. रशियाने जेव्हा या शाळेवर बॉम्ब फेकले तेव्हा शाळेत ९० जण उपस्थित होते. 

जेव्हा रशियाने या शाळेवर एअरस्ट्राई केला तेव्हा या एअरस्ट्राईकमध्ये संपूर्ण शाळा उध्वस्त झाली. शाळेच्या ढिगार्‍यातून तीस जणांना बाहेर काढण्यात आले आहे. शाळेच्या ढिगार्‍याखाली ६० जण मृत पावल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तब्बल चार तासांच्या परिश्रमानंतर या भागातील आग विझवण्यात यश आले. त्यानंतर ढिगारा उपसण्यात आला आणि दुर्दैवाने त्यात दोन जणांचा मृतदेह आढळला.  रशिया पुन्हा हल्ला करेल या भितीने अग्निशमन दलाच्या लोकांनी काम थांबवले होते. नंतर रविवारी सकाळपासून  ढिगारा उपसण्यास पुन्हा सुरूवात केली. 


रशियन सैन्यांनी शनिवारी युक्रेनच्या दक्षिण भागातील ओडेसा शहरात मिसाईल हल्ले होते. रशियाने मारियुपोल भागातील स्टीलच्या प्लांटवरही हल्ला केला. तर दुसरीकडे युक्रेनियन सैन्याने ब्लॅक सी जवळील बेटांवर रशियन सैनिक तळ उध्वस्त केले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी