62 terrorists were killed in encounters so far this year in Jammu Kashmir : श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये १ जानेवारी २०२२ पासून २७ एप्रिल २०२२ पर्यंत ६२ दहशतवादी ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये सर्वाधिक दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे आहेत. ही माहिती काश्मीरच्या आयजीपींनी (Inspector General of Police - IGP) दिली.
जम्मू काश्मीरमध्ये १ जानेवारी २०२२ ते २७ एप्रिल २०२२ या कालावधीत ६२ दहशतवादी ठार झाले. यात 'लष्कर-ए-तोयबा'चे ३९, 'जैश-ए-मोहम्मद'चे १५, 'हिजबुल मुजाहिदीन'चे ६ आणि 'अल बद्र'चे २ दहशतवादी ठार झाले. ही आकडेवारी काश्मीरच्या आयजीपींनी (Inspector General of Police - IGP) दिली.
कलम ३७० रद्द झाल्यानंतर सुरक्षा पथकांना केंद्र सरकारने दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी पुरेसे अधिकार आणि स्वातंत्र्य दिले. याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. दहशतवादी मारणे, दहशतवादी पकडणे अशा स्वरुपात सुरक्षा पथके सक्रीय झाल्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधीत आहे. राज्यात शांतता आणि कायदा सुव्यवस्था असल्यामुळे मागील काही महिन्यांपासून जम्मू काश्मीरमधील पर्यटनात वाढ होऊ लागली आहे. यामुळे जम्मू काश्मीरमध्ये आनंदाचे वातावरण आहे.