Essential Medicines Prices : भारत सरकारचा निर्णय, 651 औषधांच्या किंमतीत केली कपात

651 essential medicines prices reduced by Government of India : भारत सरकारने देशात विकल्या जाणाऱ्या 651 अत्यावश्यक औषधांच्या किंमती घटविण्याचा निर्णय घेतला आहे.

651 essential medicines prices reduced by Government of India
भारत सरकारचा निर्णय, 651 औषधांच्या किंमतीत केली कपात  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारत सरकारचा निर्णय
  • 651 औषधांच्या किंमतीत केली कपात
  • एनपीपीए या संस्थेने ट्वीट करून निर्णयाची माहिती दिली

651 essential medicines prices reduced by Government of India : भारत सरकारने देशात विकल्या जाणाऱ्या 651 अत्यावश्यक औषधांच्या किंमती घटविण्याचा निर्णय घेतला आहे. या औषधांच्या किंमतीत सरासरी 6.73 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. राष्ट्रीय औषध मूल्य निश्चिती प्राधिकरण (National Pharmaceutical Pricing Authority : NPPA) या संस्थेने औषध मूल्य नियंत्रणाच्या तरतुदींचा आधार घेत किंमतींमध्ये घट केली आहे. एनपीपीए या संस्थेने ट्वीट करून निर्णयाची माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने 870 औषधांचा समावेश अत्यावश्यक औषधांच्या यादीत केला आहे. या यादीतील 651 औषधांचे कमाल मूल्य एनपीपीए या संस्थेने निश्चित केले आहे. या कमाल मर्यादेपेक्षा कमी किंमतीत संबंधित औषधे विकण्यास परवानगी आहे. पण कमाल मर्यादेपेक्षा जास्त किंमतीत ही औषधे विकण्यास बंदी आहे. 

वाढत्या महागाईचा विचार करून औषधांच्या किंमतीत दरवर्षी थोडी वाढ करण्यास परवानगी आहे. पण किंमती अव्वाच्या सव्वा वाढू नये यासाठी त्यांची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 

राष्ट्रीय औषध मूल्य निश्चिती प्राधिकरण (National Pharmaceutical Pricing Authority : NPPA) म्हणजे काय?

राष्ट्रीय औषध मूल्य निश्चिती प्राधिकरण (National Pharmaceutical Pricing Authority : NPPA) दरवर्षी महागाईचा आणि औषधांच्या दरांचा आढावा घेते. यानंतर प्राधिकरण अत्यावश्यक औषधांच्या कमाल किंमती जाहीर करते. या व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय औषध मूल्य निश्चिती प्राधिकरणाने 651 अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत घट केली आहे.

अशी आहे टाटाची इलेक्ट्रिक कार

दहा लाखांपेक्षा कमी किमतीच्या CNG कार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी