Crime News: बंगळुरूतील जेपी नगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 17 नोव्हेंबर रोजी एका प्लास्टिक बॅगमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. तपास केल्यावर हा मृतदेह एका बिझनेसमनचा असल्याची माहिती समोर आली. तसेच या व्यक्तीचा मृत्यू हा सेक्स करत असताना फिट आल्याने झाला असल्याचं समोर आलं. पोलिसांच्या मते, 67 वर्षीय बिझनेसमनचे एका 35 वर्षीय विवाहित महिलेसोबत संबंध होते. 16 नोव्हेंबर रोजी हा व्यक्ती त्या महिलेच्या घरी पोहोचला आणि त्यांच्यात लैंगिक संबंध सुरू झाले. लैंगिक संबंध ठेवत असतानाच त्याला फिट आला आणि बेडवरच त्याचा मृत्यू झाला.
या व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर घाबरलेल्या महिलेने त्या बिझनेसमनचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. घाबरलेल्या या महिलेला वाटले की, या प्रकरणाची इतरांना माहिती झाली तर सर्वत्र बदनामी होईल. त्यानंतर या महिलेने आपल्या पतीला आणि भावाला फोन करुन बोलावले. मग, या तिघांनी मिळून बिझनेसमनचा मृतदेह एका प्लास्टिक बॅगमध्ये टाकून फेकला. पोलिसांच्या चौकशीत महिलेने पूर्ण सत्य सांगितले. महिलेचं म्हणणं आहे की, आपले बिझनेसमन सोबत संबंध होते याबाबत कुणालाही कळू नये म्हणून तिने हे केलं.
हे पण वाचा : कुटुंबासोबत सिनेमा पाहताना तसा सीन आल्यावर कोणत्या राशीची व्यक्ती कशी वागते
पोलिसांच्या मते, बिझनेसमनच्या कुटुंबीयांची चौकशी केली आहे. त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आपल्या सुनेकडे जातो असे सांगून ते घरातून बाहेर पडले होते. मात्र, बराचवेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल केली. पोलिसांच्या मते, बिझनेसला आरोग्याच्या संबंधित अनेक समस्या होत्या आणि ऑगस्ट महिन्यात त्याची एंजिओग्राफी सुद्धा झाली होती अशी माहिती समोर आली आहे.
हे पण वाचा : थंडीमुळे खरंच दात खराब होऊ शकतात का? वाचा
कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता हे सर्व प्रकरण समोर आलं. पोलिसांनी या मृत बिझनेसमनच्या कॉल डिटेल्स आणि मोबाइल लोकेशननुसार तपास सुरू केला. त्यानंतर त्या बिझनेसमनचं शेवटचं लोकेशन हे त्या महिलेचं घर दाखवत होतं. पोलिसांनी या महिलेचं घर गाठत चौकशी केली. त्यानंतर चौकशीत या महिलेने सर्व सत्य सांगितले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला असून रिपोर्ट आल्यावर मृत्यूचं नेमकं कारण काय आहे याबाबत अधिक माहिती समोर येईल. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर पोलीस अधिक तपास आणि कारवाई करतील.