Death while having sex: मोलकरणीसोबत सेक्स करताना ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, पोस्टमॉर्टेममधून समोर आले सत्य

गेल्या काही वर्षांपासून बाला यांचे मोलकरणीसोबत अनैतिक संबंध होते. मोलकरणीच्या घरी कुणी नसेल, तेव्हा ते तिथं यायचे आणि शरीरसंबंध प्रस्थापित करायचे. नेहमीप्रमाणे यावेळीही मोलकरणीसोबत शरीरसुख घेत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला.

Death while having sex
मोलकरणीसोबत सेक्स करताना ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू 
थोडं पण कामाचं
  • मोलकरणीसोबत ज्येष्ठ नागरिकाचे होते अनैतिक संबंध
  • संभोग करत असतानाच आला हृदयविकाराचा तीव्र झटका
  • जागीच मृत्यू झाल्यानंतर मोलकरणीचे लावली विल्हेवाट

Death while having sex: आपल्या मोलकरणीसोबत (Maid) अनैतिक संबंध ठेवलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा तिच्याशी संभोग करत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका (Massive heart attack) येऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये ही घटना घडली आहे. नेहमीप्रमाणे आपल्या नातवाला क्लासला सोडण्यासाठी गेलेल्या या ज्येष्ठ नागरिकाने मोलकरणीत तिच्या घरी एकटी असल्याचे ताडले. या संधीचा फायदा घेण्याचा विचार करत त्याने तिच्या घरी धाव घेतली. मात्र तिच्यासोबत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं. 

अशी घडली घटना

बंगळुरूधील जेपी नगर भागात राहणारे बाला सुब्रह्मण्यम हे 67 वर्षांचे गृहस्थ त्यांच्या नातवाला बॅडमिंटन क्लासला सोडण्यासाठी घराबाहेर पडले होते. दुपारी 4.55 मिनिटांनी त्यांनी आपल्या सुनेला फोन केला. आपल्याला एका महत्त्वाच्या कामासाठी जावं लागत असल्यामुळे घरी येण्यास उशीर होईल, असा निरोप तिला फोनवरून दिला. त्यानंतर ते मोलकरणीच्या घरी गेले. 

मोलकरणीसोबत अनैतिक संबंध

गेल्या काही वर्षांपासून बाला यांचे मोलकरणीसोबत अनैतिक संबंध होते. मोलकरणीच्या घरी कुणी नसेल, तेव्हा ते तिथं यायचे आणि शरीरसंबंध प्रस्थापित करायचे. नेहमीप्रमाणे यावेळीही मोलकरणीसोबत शरीरसुख घेत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. यापूर्वीही त्यांनी अँजिओप्लॅस्टी झाली होती. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे जागीच निधन झाले. त्यानंतर काय करावे, हे मोलकरणीला समजत नव्हते. 

अधिक वाचा - मित्रासोबत प्रणय करणाऱ्या मुलीला तांत्रिकनं फेवीक्विकनं चिपकवलं, नंतर घेतला जीव

प्लॅस्टिकमध्ये गुंडाळला मृतदेह

पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये, यासाठी मोलकरणीने बाला यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. आपला पती आणि भाऊ यांना तिने परिस्थितीची कल्पना दिली. दोघांच्या मदतीने चादर आणि प्लॅस्टिकच्या शीटमध्ये बाला यांचा मृतदेह गुंडाळून तो रस्त्याच्या कडेला फेकून दिला. 

घरच्यांकडून शोधाशोध

संध्याकाळी उशिरा घरी येण्याचा निरोप फोनवरून दिला तरी रात्रीपर्यंत बाला घऱी आले नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढू लागली. त्यांनी नातवाच्या क्लासच्या आसपास आणि घराच्या आसपास बरीच शोधाशोध केली. मात्र बाला यांचा काहीही शोध लागला नाही. रात्री उशिरापर्यंत बाला यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यांचा मोबाईलदेखील स्विच ऑफ येत होता. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली. 

अधिक वाचा - Bharat Jodo Yatra: राहुल गांधींना मिळाली बहीण प्रियंकाची साथ, मध्यप्रदेशातील सहभागामुळे ‘ही’ चर्चा सुरू

पोलिसांना मिळाला मृतदेह

पोलिसांना दुसऱ्या दिवशी एक मृतदेह मिळाला. कुटुंबीयांकडून खातरजमा केली असता बाला यांचाच तो मृतदेह असल्याची खात्री पटली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला. त्यावेळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं समजलं. पोलिसांनी सर्व संबंधितांची कसून चौकशी केली असता मोलकरणीने वस्तूस्थितीची कल्पना देत सत्य परिस्थिती सर्वाना सांगितली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी