Earthquake In Turkey: 7.9 रिश्टर स्केलच्या भूकंपानं तुर्की हादरली;मोठी जीवितहानी झाल्याची भीती

Earthquake In Turkey: तुर्कीमधील गाजियांटेपजवळ भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर 7.8 तीव्रतेची नोंद झाली आहे. तुर्कीसह सीरियामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहे. सीरियामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे. सिरीया (Syria), लेबनान (Lebanon), सिपरस (Cyprus), जॉर्डन (Jordan), इजिप्त (Egypt), आणि इजराइलला (Israel) देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

7.9 Richter Scale Earthquake in Turkey
7.9 रिश्टर स्केलच्या भूकंपानं तुर्की हादरली  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भूकंपामुळे झालेलं नुकसान सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं आहे.
  • या भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण तुर्कीत असून मृत्यूचा आकडा हजारोंच्या घरात जाण्याची भीती.
  • भूकंप स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:17 वाजता सुमारे 17.9 किमी खोलीवर झाला.

Earthquake In Turkey: तुर्कीत (Turkey) 7.9 तीव्रतेचा भूकंप (Turkey Earthquake)शक्तीशाली भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपामुळे तुर्कीत प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू (Epicenter of an Earthquake) दक्षिण तुर्कीत असून मृत्यूचा आकडा हजारोंच्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे केंद्रबिंदू तुर्कीमधील नूर्दगी भागापासूबन 23 किलोमीटर अंतरावर आहे. या शक्तीशाली भूकंपामुळे अनेक ठिकाणी घराची पडझड झाली आहे. ठिकठिकाणी बचावकार्य सुरू आहे.(7.9 Richter Scale Earthquake in Turkey )

अधिक वाचा  : दिग्दर्शकाच्या पत्नीने उर्मिला मातोंडकरला दिले होते फटके; पण का...

तुर्कीमधील गाजियांटेपजवळ भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर 7.8 तीव्रतेची नोंद झाली आहे. तुर्कीसह सीरियामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहे. सीरियामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे. सिरीया (Syria), लेबनान (Lebanon), सिपरस (Cyprus), जॉर्डन (Jordan), इजिप्त (Egypt), आणि इजराइलला (Israel) देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

अधिक वाचा  : रुपाली भोसलेचं 'रेड हॉट' रुप पाहून चाहते घायाळ

दरम्यान, बीएनओ न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, येथे अनेक अपार्टमेंट आणि इमारती कोसळल्या आहेत. मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून मालमत्तेचीही हानी झाल्याची माहिती मिळाली आहे. या मिळालेल्या माहितीनुसार, भूकंप स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:17 वाजता सुमारे 17.9 किमी खोलीवर झाला. यूएस जियोलॉजिकल सर्विसनं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दक्षिण तुर्कीमधील गॅझियानटेपजवळ 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.  

अधिक वाचा  :पटोलेंसोबत काम करणे अशक्य; थोरातांचं पक्षश्रेष्ठींना पत्र

तुर्की हाय अलर्टवर  

भूकंपाचे केंद्रबिंदू हे गाजियांचेप भागातील नूर्दगी परिसरातील 23 किमी अंतरावर जमिनीपासून 24.1 किलोमीटर अंतर खोलीवर आहे. एकापाठोपाठ अनेक भूकंपाचे धक्के जाणवले. पहिल्या धक्क्यानंतर 11 मिनिटाने 9.9 किमी अंतरावर 6.7 तीव्रतेचा आणखी एक भूकंपाचा धक्का जाणवला. या शक्तिशाली भूकंपानंतर तुर्कीत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर समोर येत आहेत. भूकंपामुळे झालेलं नुकसान सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतं आहे. 

दरम्यान, मागील आठवड्यात 29 जानेवारीला  इराणमधील पश्चिम भागात असलेलं खोया शहर भूकंपाने हादरलं. 5.9 तीव्रतेचा भूकंपाच्या धक्क्यामुळे ठिकठिकाणी घरांची पडझड झाली होती. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. तर 440 लोक जखमी झाले होते. इराणच्या पश्चिम भागातअजरबैजान भागातील खोय शहरात हे भूकंपाचे धक्के जाणवले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी