७ वर्षीय मुलीला पॉर्न दाखवून बलात्कार, जमावाच्या बेदम मारहाणीत आरोपीचा मृत्यू

कर्नाटकमध्ये एका ७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या व्यक्तीला जमावाने मारहाण केली. ज्यात आरोपीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.  

Rape Case
७ वर्षीय मुलीला पॉर्न दाखवून बलात्कार, जमावाच्या बेदम मारहाणीत आरोपीचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना
  • आरोपीला गावकऱ्यांकडून बेदम मारहाण
  • मारहाणीत आरोपीचा मृत्यू, तिघांना अटक

बंगळुरू: कर्नाटकातील एका खेड्यात एका वासनांध आरोपीला गावकऱ्यांनीच बेदम मारहाण केली ज्यात त्याचा मृत्यू झाला. येथे एका ३० वर्षीय व्यक्तीने सात वर्षीय मुलीचे  लैंगिक शोषण केल्याचं समजताच गावकऱ्यांनी थेट कायदा आपल्या हातात घेतला. जेव्हा पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना या कृत्याबद्दल समजलं तेव्हा त्यांनी याबाबतची माहिती गावकऱ्यांना दिली. त्यामुळे संतापलेल्या जमावाने आरोपीला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली.

ही घटना केरागोडू पोलीस स्टेशन हद्दीतील कोडीहल्ली गावात घडली. भैरप्पा अशी मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन मुलीला आरोपीने एका अज्ञातस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यावेळी आरोपीने मुलीला पॉर्न दाखवलं असल्याचंही सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर जेव्हा मुलगी घरी परतली तेव्हा तिने घडल्या प्रकाराबाबत आपल्या कुटुंबीयांना सांगितलं. 

आरोपी अल्पवयीन मुलांना दाखवायचा पॉर्न

मुलीवरील अत्याचाराची बातमी समजताच तिचे कुटुंबीय प्रचंड संतप्त झाले आणि त्यांनी भैरप्पाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आरोपी गंभीर जखमी झाला. नंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. दरम्यान, उपचारादरम्यान गुरुवारी त्याचा मृत्यू झाला.  पोलिसांनी सांगितले की, याआधी देखील गावकऱ्यांनी आरोपी भैरप्पाला लहान मुलांना पॉर्न दाखवत असताना रंगेहाथ पकडलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपीला त्याचवेळी गावकऱ्यांनी कडक इशारा देण्यात आला होता. मात्र, आता त्याने थेट अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. ज्यामध्ये त्याचा त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी भैरप्पाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे.

दिल्लीतही घडली होती अशीच एक घटना

दरम्यान, गेल्या महिन्यात अशीच एक घटना उत्तर दिल्लीतील सदर बाजार भागात घडली होती. जिथे एका आठ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर एका ४० वर्षीय व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला होता.  अल्पवयीन मुलगी जेव्हा तिच्या घराबाहेर आजीसोबत झोपलेली असताना आरोपीने तिचं अपहरण केलं होतं. 

अल्पवयीन जेव्हा घरी परतली तेव्हा तिच्या गुप्तांगातून प्रचंड  रक्तस्त्राव होऊ लागला. ज्यानंतर तिला तिच्या कुटुंबीयांनी जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यावेळी एका ४० वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांना तात्काळ कळविण्यात आलं होतं. पोलिसांनी पीडित मुलीकडून आरोपीची नेमकी माहिती मिळविल्यानंतर २४ तासांच्या आतच त्याच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याच्या संबंधित कलमान्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी