७३वा स्वातंत्र्य दिन: तर १५ ऑगस्ट नव्हे या दिवशी स्वतंत्र झाला असता भारत

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 13, 2019 | 20:53 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

खरंतर १९३०मध्येच काँग्रेसने स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी २६ जानेवारीची निवड केली होती. दरम्यान इंडिया इंडिपेंड्स बिलनुसार ब्रिटीश प्रशासनाने सत्ता हस्तांतरणासाठी ३ जून १९४८ ही तारीख निश्चित केली होती.

indian flag
भारताचा झेंडा 

थोडं पण कामाचं

  • १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला इंग्रजांच्या राजवटीतून मुक्तता
  • भारताला स्वांतत्र्य करण्यासाठी दुसऱ्या तारखेवर सहमती झाली होती.
  • १९३०मध्येच काँग्रेसने स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी २६ जानेवारीची निवड केली होती

मुंबई: भारत यंदा १५ ऑगस्टला आपला ७३वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला इंग्रजांच्या राजवटीतून मुक्तता मिळाली होती. तब्बल दीडशे वर्षे इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले. त्यानंतर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. मात्र तुम्हाला माहीत आहे का भारताला स्वांतत्र्य करण्यासाठी दुसऱ्या तारखेवर सहमती झाली होती. मात्र इंग्रजांनी आपली चाल यशस्वी ठरवण्यासाठी यात बदल केले. 

खरंतर १९३०मध्येच काँग्रेसने स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी २६ जानेवारीची निवड केली होती. दरम्यान इंडिया इंडिपेंड्स बिलनुसार ब्रिटीश प्रशासनाने सत्ता हस्तांतरणासाठी ३ जून १९४८ ही तारीख निश्चित केली होती. फेब्रुवारी १९४७मध्ये ब्रिटीशचे पंतप्रधान क्लेमेंट रिचर्ट एटली यांनी घोषणा केली होती की सरकार ३ जून १९४८ला भारताला संपूर्ण प्रशासनाचा अधिकार देईल. दरम्यान, माऊंटबॅटन यांच्या अध्यक्षतेखाली आल्याने सारे बदले. फेब्रुवारी १९४७मध्ये लुई माऊंटबॅटन ला भारताचा अखरेचे व्हॉयसरॉय  म्हणून नियुक्त करण्यात आले होते. माऊंटबॅटन याआधी शेजारील देश बर्माचे गर्व्हनर होते. त्यांच्याकडे भारताला सत्ता हस्तांतरण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 

माऊटबॅटन यांनी काय केले?

काही इतिहास तज्ञांच्या मते माऊंटबॅटन ब्रिटनसाठी १५ ऑगस्ट ही तारीख शुभ मानत होता. कारण दुसरे युद्धाच्या वेळेस १५ ऑगस्ट १९४५ला जपानी सैन्याने आत्मसमर्पण केले होते. तेव्हा माऊंटबॅटन अलाईड लष्कराचे कमांडर होते. यासाठी माऊंटबॅटन यांनी ब्रिटीश प्रशानाशी चर्चा करून भारताला सत्ता हस्तांतरित करण्याची तारीख ३ जून १९४८वरून १५ ऑगस्ट १९४७ केली. 

दरम्यान दुसऱ्या इतिहासकारांनी याला दुसरे कारण दिले. भारताला ३ जून १९४८ रोजी स्वातंत्र्य देण्याऐवजी १५ ऑगस्ट १९४७ला सत्ता हस्तांतरित करण्याचे आणखी एक कारण सांगितले जाते. ब्रिटीशांना या बातमीची कुणकुण लागली की मोहम्मद अली जिन्ना यांना कॅन्सर होता त्यामुळे ते जास्त दिवस जिवंत राहू शकत नाही. हेच लक्षात घेता इंग्रजांना चिंता होती की जर जिन्ना जगले नाहीत तर महात्मा गांधी वेगळा देश न बनवण्याच्या प्रस्तावावर मुसलमानांचे मन जिंकून घेतील. 

जिन्ना यांच्या मरणाच्या भीतीने झाले सारे

खरंतर जिन्ना असा चेहरा होते ज्यांना पुढे ठेवून ब्रिटीशांनी भारताला दोन तुकड्यांमध्ये विभागणी करण्याचा कट रचला होता. देशात ब्रिटीशांनी असे हिंदू-मुसलमान ध्रुवीकरण केल्याने ज्याच आग पुढील अनेक शतकांपर्यंत मिटू शकली नाही. जर जिन्ना यांचा मृत्यू ब्रिटीशांचा प्लान पूर्ण होण्याआधी झाला असता तर त्यांच्यासाठी ही समस्या झाली असती. १५ ऑगस्ट ब्रिटीशांसाठी शुभ दिवस होता कारण याच दिवशी ब्रिटन आणि मित्र राष्ट्रांनी जपानने आत्मसमर्पण करवून दुसरे जागतिक युद्ध जिंकले होते. अखेर १५ ऑगस्ट १९४७ला ब्रिटनने भारताला सत्ता हस्तांतरित केले. हे सगळे झाल्यानंतर महिन्याभरातच जिन्ना यांचा मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
७३वा स्वातंत्र्य दिन: तर १५ ऑगस्ट नव्हे या दिवशी स्वतंत्र झाला असता भारत Description: खरंतर १९३०मध्येच काँग्रेसने स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी २६ जानेवारीची निवड केली होती. दरम्यान इंडिया इंडिपेंड्स बिलनुसार ब्रिटीश प्रशासनाने सत्ता हस्तांतरणासाठी ३ जून १९४८ ही तारीख निश्चित केली होती.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
INX Media case: काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना अटक
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
पाकिस्तानला मोठा झटका देण्यासाठी मोदी सरकारने केला 'हा' सर्वात मोठा प्लान
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
जीएसटीने केला घोळ; पार्ले कंपनी दहा हजार कामगारांना काढून टाकणार
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
P Chidambaram INX Media case: चिदंबरम यांच्या अडचणींमध्ये वाढ; सर्वोच्च न्यायलयाकडूनही अद्याप दिलासा नाही
पंतप्रधान मोदींच्या न्यू यॉर्क भेटीत अडचण आणण्यासाठी हा प्लान करत आहे पाकिस्तान 
पंतप्रधान मोदींच्या न्यू यॉर्क भेटीत अडचण आणण्यासाठी हा प्लान करत आहे पाकिस्तान 
ज्या इमारतीचं उद्घाटन केलं तिथेच आरोपी म्हणून आले चिदंबरम! 
ज्या इमारतीचं उद्घाटन केलं तिथेच आरोपी म्हणून आले चिदंबरम! 
Donald Trump On Kashmir: काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांना चिंता; मध्यस्थीची तयारी
Donald Trump On Kashmir: काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांना चिंता; मध्यस्थीची तयारी
उत्तराखंड :  पूरग्रस्त भागात मदत सामुग्री घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात, २ जण ठार 
उत्तराखंड :  पूरग्रस्त भागात मदत सामुग्री घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला अपघात, २ जण ठार