Indian citizenship : पाकिस्तानच्या ७३०६ जणांना हवी भारताची नागरिकता

7306 applicants from Pakistan applied for Indian citizenship : पाकिस्तानच्या ७ हजार ३०६ नागरिकांनी डिसेंबर २०२१ पर्यंत भारताची नागरिकता मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. अफगाणिस्तान, श्रीलंका, अमेरिका, नेपाळ आणि बांगलादेशच्या नागरिकांनीही भारताची नागरिकता मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.

7306 applicants from Pakistan applied for Indian citizenship
पाकिस्तानच्या ७३०६ जणांना हवी भारताची नागरिकता 
थोडं पण कामाचं
  • पाकिस्तानच्या ७३०६ जणांना हवी भारताची नागरिकता
  • अफगाणिस्तान, श्रीलंका, अमेरिका, नेपाळ आणि बांगलादेशच्या नागरिकांनीही भारताची नागरिकता मिळवण्यासाठी केला अर्ज
  • भारताकडे यंदाच्या वर्षी १४ डिसेंबर २०२१ पर्यंत नागरिकता मिळवण्यासाठी आले १० हजार ६३५ अर्ज

7306 applicants from Pakistan applied for Indian citizenship : नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ७ हजार ३०६ नागरिकांनी डिसेंबर २०२१ पर्यंत भारताची नागरिकता मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. अफगाणिस्तान, श्रीलंका, अमेरिका, नेपाळ आणि बांगलादेशच्या नागरिकांनीही भारताची नागरिकता मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. भारताकडे यंदाच्या वर्षी १४ डिसेंबर २०२१ पर्यंत नागरिकता मिळवण्यासाठी १० हजार ६३५ अर्ज आले आहेत. ही माहिती भारताचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली.

नागरिकता मिळवण्यासाठी आलेल्या अर्जांची नियमानुसार तपासणी सुरू आहे. मागील चार वर्षांत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून आलेल्या अल्पसंख्यांक समुदायाच्या (संबंधित देशात अल्पसंख्यांक असलेल्या) ३ हजार ११७ जणांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले; असे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितले.

२०१८ पासून १४ डिसेंबर २०२१ पर्यंत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशमधून शीख, जैन, हिंदू, ख्रिस्ती समाजाच्या ८ हजार २४४ जणांनी भारताच्या नागरिकतेसाठी अर्ज केला आहे. या नागरिकांनी विदेशी अधिनियम १९४६, विदेशींची नोंदणी अधिनियम १९३९, पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम १९२० आणि नागरिकता अधिनियम १९५५ अंतर्गत नागरिकतेसाठी अर्ज केला आहे; असे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय राज्यसभेत म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी