7th Pay Commission: नवी दिल्ली : केंद्रीय सरकारी कर्मचार्यांसाठी एक खुष खबर आहे. लवकरच त्यांच्या खात्यात दोन लाख रुपये जमा होणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून महागाई भत्त्यावर लवकरच निर्णय होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचार्यांच्या खात्यात दोन लाख रुपये जमा होणार आहे.
गेल्या १८ महिन्यांपासून केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यावर अद्याप निर्णय झाला नव्हता. आता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून लवकरच निर्णय होणार आहे. वित्त मंत्रालय, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग आणि डीपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर मधील अधिकार्यांची बैठक होणार आहे. त्यात केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यावर चर्चा होणार आहे. लेव्हल - १ अधिकार्यांचा ११ हजार ८०० ते ३७ हजारपर्यंत महागाई भत्ता बाकी आहे. लेवल - १३ कर्मचार्यांचा १ लाख ४४ हजार २०० ते २ लाख १८ हजार २०० महागाई भता मिळण्याची शक्यत आहे. केंद्रीय कर्मचार्यांना महागाई भत्ता मिळेल असे केंद्र सरकारने संसदेत स्पष्ट केले होते.
केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता दरवर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान अद्यावत केला जातो. वर्तमानाच्या किंमतीशी मूळ वेतनाशी गुणल्यानंतर महागाई भत्ता ठरवला जातो. सर्व सकारी कर्मचारी आणि आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता दिला जातो.