8 coaches of bandra terminus to jodhpur suryanagari express train derailed in pali rajasthan : वांद्रे टर्मिनस ते जोधपूर सूर्यनगर एक्सप्रेस ट्रेनचे 8 डबे रुळांवरुन घसरले. ही घटना आज (सोमवार 2 जानेवारी 2023) मध्यरात्री 3 वाजून 27 मिनिटांनी घडली. ट्रेनचे डबे राजस्थानमधील (Rajasthan) पाली येथे रुळांवरुन घसरले. रेल्वेच्या जोधपूर मंडळाच्या रजकियावास ते बोमदरा सेक्शन दरम्यान अपघात झाला. या अपघातात जीवितहानी झालेली नाही. ही माहिती उत्तर पश्चिम रेल्वे (North Western Railway) विभागाने दिली.
रुळांवरुन घसरलेले डबे उचलून स्थिती सावरण्यासाठी क्रेनची मदत घेतली जात आहे. मदतकार्यासाठी रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक पण घटनास्थळी दाखल झाले आहे. अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. या जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले आहे. इतर प्रवाशांना विशेष बसमधून पुढील प्रवासाकरिता रवाना करण्यात आले आहे. रेल्वेचे तंत्रज्ञ पण घटनास्थळी कार्यरत झाले आहेत. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू आहे.
Pausha Putrada Ekadashi 2023 : कधी आहे 2023 मधील पहिली एकादशी?