५४ वर्षीय महिलेवर ८ जणांचा सामूहिक बलात्कार, पीडित महिला गंभीर जखमी

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 25, 2019 | 19:04 IST | टाइम्स नाऊ मराठी

हरियाणातील करनालमध्ये एका ५४ वर्षीय महिलेवर गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे.

54_year_old_lady_gangraped
५४ वर्षीय महिलेवर ८ जणांकडून गँगरेप, पीडिता गंभीर जखमी  |  फोटो सौजन्य: ANI

थोडं पण कामाचं

  • ५४ वर्षीय महिलेवर ८ जणांकडून सामूहिक बलात्कार
  • रेल्वे स्टेशनजवळील फॅक्टरीमध्ये नेऊन महिलेवर अत्याचार
  • महिलेची प्रकृती गंभीर,  चंदीगडमध्ये सुरु आहेत उपचार

हरियाणा: हरियाणातील करनाल येथे एका ५४ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना १४ ऑगस्टला घडली असल्याचं आता समजतं आहे. या प्रकरणातील पीडित महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं समजतं आहे. सध्या तिच्यावर रोहतकमध्ये उपाय सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून चौकशी देखील सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल ८ जणांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचं समजतं आहे. या प्रकरणी संपूर्ण हरियाणामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तसंच आरोपींवर  कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी मागणीही केली जात आहे. 

सध्या पीडित महिलेची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचं समजतं आहे. सध्या पीडितेवर पीजीआय चंदीगडमध्ये उपचार सुरु आहेत. सुरुवातीला तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण नंतर तिला चंदीगडमध्ये हलविण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून डॉक्टरचं एक पथक सतत तिच्या प्रकृतीवर नजर ठेऊन आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने आपत्कालीन १०० नंबरवर कॉल करुन पोलिसांकडे मदत मागितली होती. त्यामुळे पोलीस तात्काळ महिलेचा शोध घेतला. 

महिलेचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तिचा नंबर ट्रेस करुन तिचा ठावठिकाणा तात्काळ शोधून काढला. त्यानंतर तिला लगेचच ट्रॉमा सेंटरमध्ये दाखलही करण्यात आलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आठ अज्ञात आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच करनाल पोलीस ठाण्याला याबाबत चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. तसंच फरार आरोपींना शोधून काढण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

एफआयआरनुसार पीडित महिला ही मूळची उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहे. घटना घडली त्या दिवशी ती करनाल रेल्वे स्टेशनवर बसली होती. त्याच वेळी आठ आरोपींपैकी एक जण तिच्याजवळ आला आणि त्याने  तिला जेवण ऑफर केलं. त्यानंतर आरोपीने महिलेला एका हॉटेलच्या मागील असलेल्या एका फॅक्टरीमध्ये नेलं. जिथे आधीच ७ जणं हजर होते. त्यानंतर या आठही जणांनी महिलेवर सामूहिक अत्याचार केले. 

पीडित महिलेने आपल्या तक्रारीमध्ये असं नमूद केलं आहे की, 'मी जेव्हा त्या नराधामांना विरोध केला तेव्हा त्यांच्यापैकी एकाने मला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.' मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकाही आरोपीचा शोध लागलेला नाही. कारण या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले आहेत. त्यामुळे आता आरोपींना शोधून काढण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळेच आता पोलीस फॅक्टरीजवळील लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून काही पुरावा मिळतोय का? याबाबत प्रयत्न करत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...