Digital Rape : नोएडा : दिल्लीत एक विचित्र घटना समोर आली आहे. एका ८१ वर्षीय वृद्धाने एका अल्पवयीन मुलीवर डिजिटल बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम वृद्धाला अटक केली आहे.
अधिक वाचा : पाच महिन्यांपासून सातवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार, सहा जणांना अटक
पोलिसांनी दिलेला माहितीनुसार अरोपी हिमाचल प्रदेशचा रहिवासी आहे. आरोपीच्या मित्राला एक मुलगी होती. या मित्राने आपली मुलगी आरोपीकडे राहण्यासाठी पाठवली जेणेकरून तिला चांगले शिक्षण मिळावे. परंतु वृद्ध व्यक्तीने याचा गैरफायदा घेत या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. अखेर मुलीने या जाचाला कंटाळून पोलिसांत तक्रार घेतली. यासाठी पीडित मुलीने पुरावेही गोळा केले होते. बहुतांश पुराव्यांमध्ये ऑडियो फाईल्स आहेत. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला नोएडामधून अटक केली आहे.
डिजिटल बलात्कार म्हणजे एखाद्या महिलेवर किंवा तरुणीवर जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवणे. या संबंधात मानवी लिंगाचा वापर होत नाही. पूर्वी अशा प्रकरणे बलात्कार गुन्ह्याअंतर्गत येत नव्हते. परंतु २०१२ च्या निर्भया प्रकरणानंतर बलात्काराची व्याख्य बदलण्यात आली.