एका दिवसात ८६ हजार नवे रुग्ण सापडले, महाराष्ट्रातील आकडा किती?

corona positive patients: देशात मागील २४ तासात तब्बल ११८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ८६,८२१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ६३,१२,५८५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

corona patients
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या (फोटो सौजन्य: iStock Images) 

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
  • देशात आता कोरोना रुग्णांची संख्या ६३ लाखांच्यावर 
  • गेल्या २४ तासात देशात ११८१ जणांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases today: देशात गेल्या २४ तासात तब्बल ८६,८२१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Positive Patient) सापडले आहेत. तर तब्बल ११८१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी आपले प्राण (Corona Patient Death)सोडले आहेत. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. आतापर्यंत देशात एकूण ६३ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ९ लाख ४० हजाराहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients)आहेत. 

देशात आतापर्यंत एकूण ९८ हजारांहून जास्त कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ६३ लाखांच्या देखील पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण ६३,१२,५८५ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी ९८,६७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

देशात आतापर्यंत ५२,८३,२०२ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या ९,४०,७०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण:

S. No. Name of State / UT Active Cases* Discharged* Deaths*
1 Andaman and Nicobar Islands 174 3608 53
2 Andhra Pradesh 58445 629211 5828
3 Arunachal Pradesh 2890 6890 16
4 Assam 34496 145618 697
5 Bihar 12092 169732 904
6 Chandigarh 1963 9813 162
7 Chhattisgarh 30927 81718 957
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 109 2929 2
9 Delhi 26908 247446 5361
10 Goa 4865 28125 428
11 Gujarat 16683 117099 3450
12 Haryana 14340 112877 1382
13 Himachal Pradesh 3400 11390 186
14 Jammu and Kashmir 17017 56872 1181
15 Jharkhand 11596 71342 713
16 Karnataka 107635 485268 8864
17 Kerala 67140 128224 742
18 Ladakh 1064 3147 58
19 Madhya Pradesh 20997 104734 2316
20 Maharashtra 259462 1088322 36662
21 Manipur 2456 8460 67
22 Meghalaya 1615 3975 49
23 Mizoram 420 1597 0
24 Nagaland 1080 5066 17
25 Odisha 32577 185700 842
26 Puducherry 4949 22074 521
27 Punjab 16814 93666 3406
28 Rajasthan 20581 113225 1486
29 Sikkim 672 2303 37
30 Tamil Nadu 46263 541819 9520
31 Telengana 29058 163407 1135
32 Tripura 5691 20092 283
33 Uttarakhand 9111 39278 611
34 Uttar Pradesh 50883 342415 5784
35 West Bengal 26332 225759 4958
Total# 940705 5273201 98678
 

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात मागील २४ तासात १८,३१७ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १३,८४,४४६ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात १९,१६३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण  १०,८८,३२२ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. 

राज्यात एकूण २,५९,४६२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, काल एका दिवसात ४८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  आतापर्यंत राज्यात एकूण ३६,६६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी