87 वर्षाच्या माजी CM ला मिळालं दहावी अन् बारावीचं मार्कशीट, इंग्रजीत मिळाले 88 मार्क

'वय म्हणजे फक्त एक संख्या' अशी एक जुनी इंग्रजी म्हण आहे.  ही म्हण नेहमी वापरली जाते जेव्हा एखादी वृद्ध व्यक्ती काही काम करते ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटेल. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री (CM)  ओम प्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) यांनीही असाच एक कारनामा केला असून सर्व आश्चर्यचकीत झाले आहेत.

87 year old ex-CM got 10th and 12th marksheet
87 वर्षी माजी मुख्यमंत्री साहेब उत्तीर्ण झाले 10-12   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांची मार्कशीट मिळाल्यानंतर अभिषेक बच्चननेही ट्विट केलं
  • हरियाणा शालेय शिक्षण मंडळाने त्यांचे पूर्ण निकाल जाहीर केले.
  • हरियाणा शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या आदराने माजी मुख्यमंत्र्यांना दहावी आणि बारावीची मार्कशीट दिली.

Former CM cleared 10th at age of 87: 'वय म्हणजे फक्त एक संख्या' अशी एक जुनी इंग्रजी म्हण आहे.  ही म्हण नेहमी वापरली जाते जेव्हा एखादी वृद्ध व्यक्ती काही काम करते ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटेल. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री (CM)  ओम प्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) यांनीही असाच एक कारनामा केला असून सर्व आश्चर्यचकीत झाले आहेत.  87 वर्षाच्या चौटाला यांनी दहावी आणि बारावीत जबरदस्त यश मिळवलं आहे. 

माजी मुख्यमंत्र्यांना आदरपूर्वक देण्यात आलं मार्कशीट 

वास्तविक, हरियाणा बोर्डाने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोक दलाचे प्रमुख ओम प्रकाश चौटाला यांना 10वी आणि 12वीची मार्कशीट दिले आहेत.  वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४२८ व्या जयंती कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी चौधरी चौटाला सोमवारी आले होते. त्यावेळी भिवानीमध्ये हरियाणा शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या आदराने माजी मुख्यमंत्र्यांना दहावी आणि बारावीची मार्कशीट दिली.

बोर्डाने थांबवून ठेवली होते मार्कशीट 

उल्लेखनीय आहे की, माजी सीएम चौटाला यांनी 2019 मध्ये 10वीची परीक्षा दिली होती, मात्र त्यावेळी त्यांना इंग्रजीचा पेपर देता आला नव्हता. चौटाला यांचा दहावीचा इंग्रजीचा निकाल न आल्याने हरियाणा शालेय शिक्षण मंडळानेही त्यांचा बारावीचा निकाल रोखून धरला होता. त्यामुळे बोर्डाने त्यांची गुणपत्रिका थांबवली होती. तथापि, ऑगस्ट 2021 मध्ये त्याने 10वीचा इंग्रजीचा पेपर दिला होता ज्यामध्ये त्यांना 88% गुण मिळाले होते.

वयाच्या 87 व्या वर्षी 10वी आणि 12वी उत्तीर्ण 

माजी मुख्यमंत्र्यांनी बोर्डाला एक अर्ज दिला होता, त्यात त्यांचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून बारावीचा प्रलंबित निकालही जाहीर करावा, असे नमूद केले होते. यानंतरच हरियाणा शालेय शिक्षण मंडळाने त्यांचे पूर्ण निकाल जाहीर केले. यासह, वयाच्या 87 व्या वर्षी 10वी आणि 12वी उत्तीर्ण होणारे ते नेते बनले.  नुकताच अभिषेक बच्चनचा एक चित्रपटही आला आहे ज्यात तो मुख्यमंत्री झाल्यानंतर दहावीची परीक्षा उत्तीर्ण होतो 

अभिषेक बच्चनने केले  ट्विट

माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांची मार्कशीट मिळाल्यानंतर अभिषेक बच्चननेही ट्विट करून #dasvi लिहिले. माजी मुख्यमंत्री वयाच्या 87 व्या वर्षी प्रथम श्रेणीसह 10वी आणि 12वी उत्तीर्ण झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी