लॉकडाऊनमुळे हॉस्टेलमध्ये अडकलेल्या ९ वर्षीय मुलावर वॉर्डनचा लैंगिक अत्याचार

लॉकडाऊनच्या काळात हॉस्टेलमधील वॉर्डनने एका नऊ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ३० वर्षीय वॉर्डनला पोलिसांनी अटक केली आहे.

9 year old boy sexually harass by hostel warden in uttarakhand during lockdwon crime news marathi 
फोटो सौजन्य: iStockImages (प्रातिनिधीक फोटो)  

थोडं पण कामाचं

  • लॉकडाऊनमुळे पीडित मुलाचे आई-वडील त्याला घरी घेऊन जाऊ शकले नाहीत 
  • शाळेतील कर्मचाऱ्यांनी सुद्धा मुलाला सोबत घेऊन जाण्यास नकार दिल्याचा पालकांचा आरोप 
  • आरोपी वॉर्डनने ९ वर्षीय मुलावर केले लैंगिक अत्याचार

देहरादून: लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार, व्यापार, उद्योगधंदे, प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. या लॉकडाऊनमध्ये नऊ वर्षांचा मुलगा हॉस्टेलमध्ये अडकला. हॉस्टेलमध्ये अडकलेल्या या मुलावर लॉकडाऊनच्या काळात हॉस्टेलमधील वॉर्डनने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देहरादून येथे ही घटना घडली आहे.

ही धक्कादायक घटना एक महिन्यापूर्वी रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पीडित मुलगा हा हॉस्टेलमध्ये तिसऱ्या इयत्तेत शिक्षण घेत आहे आणि तो उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे पीडित मुलाचे आई-वडील त्याला आपल्या घरी घेऊन जाऊ शकले नाहीत. रिपोर्ट्नुसार, लॉकडाऊनच्या काळात आरोपी हा एकमेव वॉर्डन होता जो हॉस्टेलमध्ये उपस्थित होता. 

पालकांचा शाळा व्यवस्थापनावर आरोप 

लॉकडाऊनमुळे हॉस्टेलमध्ये अडकलेल्या आपल्या मुलाला घेण्यासाठी शनिवारी त्याचे आई-वडील हॉस्टेलमध्ये पोहोचले त्यावेळी हा प्रकार समोर आला. पोलीस उपनिरीक्षक एस के रावत यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले की, या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप पीडित मुलाच्या आई-वडिलांनी केला आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, लॉकडाऊनमध्ये अनेक मुलं हॉस्टेलमध्ये अडकले होते आणि त्यामध्ये त्यांच्या मुलाचाही समावेश आहे. सुरूवातीला शाळेतील कर्मचाऱ्यांनी मुलाला घरी घेऊन जाण्यास टाळाटाळ केली. पण आम्ही घरी जाण्यासाठी विनंती केल्यावर त्यांनी जाण्यास परवानगी दिली.

पीडित मुलाने सांगितला घडलेला प्रकार 

पीडित मुलाने आपल्या सोबत घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. हॉस्टेल वॉर्डन हरिश कुमार याने आपला लैंगिक छळ केला आणि शारीरिक अत्याचार केल्याचं पीडित मुलाने सांगितले. तसेच त्याने आपली खोली स्वच्छ करण्यासही सांगितले. यानंतर पीडित मुलाच्या आई-वडिलांनी तात्काळा रायपूर पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपी वॉर्डन विरोधात तक्रार दाखल केली.

पालकांच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी आरोपी हरिश याला हॉस्टेल परिसरातून अटक केली आहे. आरोपीवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी