मेडिकल टुरिस्ट बनलेल्या दोन महिलांकडे सापडले 90 कोटींचे हेरॉईन, दिल्ली विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 14, 2021 | 16:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

दिल्ली विमानतळावर 2 महिलांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय किंमत सुमारे 90 कोटी रुपये आहे.

90 crore heroin found in two women medical tourists, customs action at Delhi airport
मेडिकल टुरिस्ट बनलेल्या दोन महिलांकडे सापडले 90 कोटींचे हेरॉईन, दिल्ली विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नैरोबी, केनिया येथून अबू धाबी मार्गे आलेल्या दोन प्रवाशांकडून 12.9 किलो हेरॉईन जप्त केले.
  • दिल्ली विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई
  • दोन महिलांकडून ९० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले

नवी दिल्ली : येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क (कस्टम्स) अधिकाऱ्यांनी युगांडाच्या दोन महिलांकडून ९० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. या महिला वैद्यकीय पर्यटक म्हणून भारतात आल्या होत्या. या संदर्भात शनिवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, अधिकाऱ्यांनी 12 आणि 13 नोव्हेंबरच्या मध्यरात्री नैरोबी, केनिया येथून अबू धाबी मार्गे आलेल्या दोन प्रवाशांकडून 12.9 किलो हेरॉईन जप्त केले.

यापूर्वीही भारतात येऊन गेल्या

सीमाशुल्क विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय किंमत सुमारे 90 कोटी रुपये आहे. अंमली पदार्थांसह तस्कर महिला पकडल्या जाण्यापूर्वी युगांडा, केनिया आणि भारतासह अनेक देशांमधून गेल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

श्वान पथकाने प्रवाशांच्या सामानाचा वास घेतला

त्यांनी हेरॉईन आपल्या सामानात लपवून ठेवले होते, त्यासाठी सूटकेसमध्ये एक खास जागा बनवली होती. दिल्ली विमानतळावर तैनात असलेल्या भारतीय कस्टम्सच्या श्वान पथकाने प्रवाशांच्या सामानाचा वास घेतल्यानंतर त्या सामानात काही मादक पदार्थ असल्याचे निदर्शनास आले, असे निवेदनात म्हटले आहे.
 

आंतरराष्ट्रीय बाजारात ९० कोटी रुपये किंमतींचा मुद्देमाल

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना विमानतळावर अटक केलेल्या युगांडाच्या दोन महिलांकडून १२.९ किलो हेराॅईन सापडली आहे. त्याची अंतरराष्ट्रीय बाजारात ९० कोटी रुपये किंमत आहे. या दोन्ही महिला तस्कर मेडिकल टुरिस्ट बनून भारतात आल्या होत्या. त्यांनी हेराॅईन ठेवण्यासाठी सुटकेसमध्ये खास जागा तयार केली होती. श्वान पथकातील श्वानांमुळे या महिला तस्कर अधिकाऱ्यांच्या हाती लागल्या.

मुंबईतही कारवाई

अलीकडेच, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मुंबई आंतरराष्ट्रीय टर्मिनल आणि सहार कार्गो कॉम्प्लेक्स येथून चार कोटी रुपये किंमतीचे हेरॉइन जप्त केले. गुप्त माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणात गुजरातमधील वडोदरा येथील एका नागरिकाला नोटिस बजावली असून, तपास करण्यात येत आहे. एनसीबीने गुजरातच्या वडोदरा येथील एका व्यक्तीचा जबाब नोंदवून घेतला आहे. या प्रकरणात पुढील चौकशी करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी