भारतात ५० लाख लोकांना कोरोनाची लागण, १० लाख अॅक्टिव्ह रुग्ण 

corona positive patients: देशात मागील २४ तासात तब्बल १२९० रुग्णांचा मृत्यू झाला. मागच्या एका दिवसात ९०,१२३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ५०,२०,३६० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

corona patients
कोरोना रुग्ण संख्या  |  फोटो सौजन्य: AP, File Image

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
  • देशात आता कोरोना रुग्णांची संख्या ५० लाख २० हजारांच्यावर  
  • गेल्या २४ तासात देशात १२९० जणांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases today: भारतात आता कोरोना रुग्णांची संख्या ५० लाखांच्या देखील पुढे गेली आहे. आतापर्यंत ५० लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी १० लाख अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients)आहेत. त्यामुळे आता कोरोना भयंकर रुप धारण करत असल्याचं दिसून येत आहे. मागील २४ तासात देशात ९०,१२३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याशिवाय गेल्या २४ तासात आजवर सर्वाधिक कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कारण काल एका दिवसात १२९० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Corona Patient Death) 

देशात आतापर्यंत एकूण ८२ हजारांहून जास्त कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ५० लाख २० हजारांच्या देखील पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण ५०,२०,३६० रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी ८२,०६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

देशात आतापर्यंत ३९,४२,३६१ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या ९,९५,९३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण:

S. No. Name of State / UT Active Cases* Discharged* Deaths**
1 Andaman and Nicobar Islands 204 3318 52
2 Andhra Pradesh 92353 486531 5041
3 Arunachal Pradesh 1795 4658 13
4 Assam 29180 116903 492
5 Bihar 13055 146980 836
6 Chandigarh 2991 5502 99
7 Chhattisgarh 35909 34279 589
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 229 2552 2
9 Delhi 29787 191203 4806
10 Goa 5102 20094 315
11 Gujarat 16357 96582 3244
12 Haryana 20430 77166 1026
13 Himachal Pradesh 3801 6444 90
14 Jammu and Kashmir 18678 37062 914
15 Jharkhand 14118 49750 571
16 Karnataka 98555 369229 7481
17 Kerala 31226 82341 466
18 Ladakh 938 2517 44
19 Madhya Pradesh 21620 69613 1820
20 Maharashtra 292174 775273 30409
21 Manipur 1745 6418 47
22 Meghalaya 1818 2190 28
23 Mizoram 558 922 0
24 Nagaland 1269 3945 15
25 Odisha 32267 125738 645
26 Puducherry 4674 15522 405
27 Punjab 21154 60814 2514
28 Rajasthan 16761 87873 1264
29 Sikkim 464 1690 19
30 Tamil Nadu 46806 458900 8502
31 Telengana 30401 131447 996
32 Tripura 7498 12435 217
33 Uttarakhand 10739 23230 438
34 Uttar Pradesh 67335 252097 4604
35 West Bengal 23942 181142 4062
Total# 995933 3942360 82066
 

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात मागील २४ तासात २०,४८२ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १०,९७,८५६ एवढी झाली आहे. तर १९,४२३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ७,७५२७३ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. 

राज्यात एकूण २,९२,१७४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात मागील २४ तासात ५१५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ३०,४०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी