एका दिवसात १२४७ रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रातील आकडा किती?

corona positive patients: देशात मागील २४ तासात तब्बल १२४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागच्या एका दिवसात ९३,३३७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ५३,०८,०१५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 

corona patients
कोरोना रुग्ण संख्या  |  फोटो सौजन्य: PTI

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
  • देशात आता कोरोना रुग्णांची संख्या ५३ लाख ०८ हजारांच्यावर
  • गेल्या २४ तासात देशात १२४७ जणांचा मृत्यू

मुंबई: Coronavirus india total cases today: गेल्या २४ तासात देशात तब्बल १२४७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू   (Corona Patient Death)  झाला आहे. जो आजवरचा सर्वात मोठा आकडा आहे. देशात काल एका दिवसात ९३ हजार रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ५३ लाखांच्या पुढे गेलेली आहे.  यापैकी १० लाखाहून जास्त अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patients)आहेत. गेल्या २४ तासात तब्बल ९३,३३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे.

देशात आतापर्यंत एकूण ८५ हजारांहून जास्त कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा एकूण आकडा हा ५३ लाख ०८ हजारांच्या देखील पुढे गेलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण ५३,०८,०१५ रुग्ण सापडले आहेत. (India total corona patients) त्यापैकी ८५,६१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

देशात आतापर्यंत ४२,०८,४३२ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या १०,१३,९६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण:

S. No. Name of State / UT Active Cases* Discharged Deaths**
1 Andaman and Nicobar Islands 165 3414 52
2 Andhra Pradesh 84423 519891 5244
3 Arunachal Pradesh 1886 5106 13
4 Assam 28631 123687 540
5 Bihar 12609 151750 859
6 Chandigarh 2978 6415 113
7 Chhattisgarh 36580 44392 645
8 Dadra and Nagar Haveli and Daman and Diu 218 2639 2
9 Delhi 32250 201671 4907
10 Goa 5730 21314 335
11 Gujarat 16076 100974 3286
12 Haryana 21291 83878 1092
13 Himachal Pradesh 4430 7081 111
14 Jammu and Kashmir 20770 39305 966
15 Jharkhand 13924 54052 602
16 Karnataka 101148 394026 7808
17 Kerala 35795 90085 501
18 Ladakh 987 2600 48
19 Madhya Pradesh 21605 76952 1901
20 Maharashtra 301273 834432 31791
21 Manipur 1926 6629 52
22 Meghalaya 1976 2437 32
23 Mizoram 575 973 0
24 Nagaland 1213 4129 15
25 Odisha 33092 137567 682
26 Puducherry 4736 16715 462
27 Punjab 21662 68463 2708
28 Rajasthan 17717 92265 1308
29 Sikkim 422 1857 24
30 Tamil Nadu 46506 475717 8685
31 Telengana 30636 137508 1025
32 Tripura 7107 14142 235
33 Uttarakhand 11293 26250 464
34 Uttar Pradesh 67825 270094 4869
35 West Bengal 24509 190021 4242
Total# 1013964 4208431 85619
 

महाराष्ट्रात नेमकी स्थिती काय?

राज्यात मागील २४ तासात २१,६५६ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ११,६७, ४९६ एवढी झाली आहे. तर २२,०७८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ८,३४,४३२ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. 

राज्यात एकूण ३,०१,२७३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, आतापर्यंत राज्यात एकूण ३१,७९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी