२४ तासात जवळजवळ १० हजार रुग्ण, नेमकं काय चाललंय देशात?

देशात मागील २४ तासात तब्बल २८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ९९७१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण २,४६,६२८ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

9971 new cases and 287 deaths reported in the last 24 hours as india's total number of positive cases 246628 found till 7 june 2020  
२४ तासात जवळजवळ १० हजार रुग्ण, नेमकं काय चाललंय देशात?   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
  • देशात आता कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ४६ हजारांच्यावर  
  • गेल्या २४ तासात देशात २८७ जणांचा मृत्यू

मुंबई:  कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ होत असल्याचे दिसत आहेत. कारण कोरोनाचे रुग्ण हे सतत वाढत असल्याचं दिसतं आहे. हा आकडा आता अडीच लाखांच्या जवळपास पोहोचला आहे, तर या प्राणघातक संसर्गामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सात हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जवळपास ८४ टक्के रुग्ण हे केवळ १० राज्यात आहेत. जिथे दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली आहे.

गेल्या २४ तासांमध्ये जवळजवळ दहा हजारांच्या जवळपास रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जी एका दिवसातील सर्वात मोठी संख्या आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात ९९७१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर २८७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २,४६,६२८ रुग्ण देशात आढळून आले आहेत. तर मृतांची संख्या ६ हजार ९२९ वर पोचली आहे.

सध्या रुग्णांचा आकडा हा वाढतानाच दिसतो आहे. दरम्यान, आतापर्यंत १,१९२९३ रुग्ण बरे झाले असून १,२०,४०६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

पाहा कोणत्या राज्यात किती रुग्ण:  

क्रमांक राज्य उपचार घेत असलेले रुग्ण* बरे झालेले रुग्ण* मृत्यू* एकूण रुग्ण*
1 अंदमान आणि निकोबार 0 33 0 33
2 आंध्रप्रदेश 1817 2620 73 4510
3 अरुणाचल प्रदेश 46 1 0 47
4 आसाम 1846 547 4 2397
5 बिहार 2460 2425 30 4915
6 चंदीगड 31 273 5 309
7 छत्तीसगड 653 266 4 923
8 दादरा नगर हवेली 18 1 0 19
9 दिल्ली 16229 10664 761 27654
10 गोवा 202 65 0 267
11 गुजरात 5057 13316 1219 19592
12 हरियाणा 1794 2134 24 3952
13 हिमाचल प्रदेश 201 194 5 400
14 जम्मू-काश्मीर 2302 1126 39 3467
15 झारखंड 520 473 7 1000
16 कर्नाटक 3186 1968 59 5213
17 केरळ 1030 762 15 1807
18 लडाख 50 48 1 99
19 मध्यप्रदेश 2721 6108 399 9228
20 महाराष्ट्र 42609 37390 2969 82968
21 मणिपूर 105 52 0 157
22 मेघालय 19 13 1 33
23 मिझोराम 23 1 0 24
24 नागालँड 107 0 0 107
25 ओडिशा 1057 1716 8 2781
26 पद्दुचेरी 63 36 0 99
27 पंजाब 373 2092 50 2515
28 राजस्थान 2599 7501 231 10331
29 सिक्किम 7 0 0 7
30 तमिळनाडू 13506 16395 251 30152
31 तेलंगणा 1663 1710 123 3496
32 त्रिपुरा 574 173 0 747
33 उत्तराखंड 869 423 11 1303
34 उत्तर प्रदेश 3828 5648 257 9733
35 पश्चिम बंगाल 4236 3119 383 7738
    8605     8605
  एकूण# 120406 119293 6929 246628
 

दरम्यान, देशात अनलॉक १.० सुरु झाला आहे. अनलॉक १.० मध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे. दरम्यान, याआधीच झोननुसार काही सवलती देण्यात आलेल्या होत्या. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने तीन भागात देशाचे विभाजन केले होते. पहिला हॉटस्पॉट जिल्हे (रेड झोन) , दुसरे करोनाचे रुग्ण आढळले पण हॉटस्पॉट नसलेले जिल्हे (ऑरेंज झोन) आणि तिसरा ग्रीन झोन जिथे करोना रुग्ण नाहीत, असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी