Teacher sexually abuses : अभ्यासासाठी घरी येणाऱ्या 14 वर्षाच्या विद्यार्थ्याचं शिक्षिकेनं केलं लैंगिक शोषण

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 04, 2021 | 17:47 IST | टाइम्स नाऊ मराठी

14 वर्षांच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षिकेवर अखेर न्यायालयाचा निर्णय आला आहे. महिला शिक्षिकेने लैंगिक शोषण केलेली हा मुलगा तिच्या घरी अभ्यासासाठी जात असे.

A 14-year-old student  sexually abuses
अभ्यासाच्या नावाने शिक्षिकेची 14 वर्षाच्या मुलासोबत रासलीला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • महिला शिक्षिका तिच्या घरी शिकवण्याच्या बहाण्याने मुलाचे लैंगिक शोषण करत असे
  • कोर्टाने आरोपी शिक्षिकेला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
  • चंदीगड कोर्टाने शिक्षिकेला लैंगिक अत्याचारप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावली


Teacher sexually abuses चंदीगड : एका 14 वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका महिला शिक्षिकेला स्थानिक न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने दोषी शिक्षकाला 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हा मुलगा महिला शिक्षिकेच्या घरी शिकवणीसाठी जात असायचा. या मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 2018 मध्ये महिला शिक्षिकेला अटक केली होती. महिला शिक्षिकेवर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. (The teacher sexually abused 14-year-old boy by calling her home. The boy used to go to her house to study.)

2017 मध्ये शिकवणी घेण्यास सुरुवात केली

फिर्यादीनुसार, दहावीचा विद्यार्थी आणि त्याच्या लहान बहिणीने सप्टेंबर 2017 मध्ये महिलेकडून शिकवणी घेण्यास सुरुवात केली. पीडितेचा ग्रेड कमी झाल्यावर ही बाब पालकांच्या लक्षात आली आणि त्यांनी पीडितेचा मोबाइल तपासला. बातमीनुसार, महिला शिक्षिकेने मुलाच्या पालकांना त्यांच्या मुली आणि मुलाला वेगवेगळ्या ट्यूशनच्या वेळी पाठवण्यास सांगितले होते. ती अधिक चांगले शिकवू शकेल, असा युक्तिवाद या शिक्षिकेने केला होता.

शिक्षकाने एकच गोंधळ घातला होता

यानंतर शिक्षकाने मुलाचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. मार्च 2018 मध्ये पालकांनी मुलाची शिकवणी बंद केल्यावर संतापलेल्या शिक्षकाने गोंधळ घातला आणि स्वतःला मुलासह एका खोलीत कोंडून घेतले. यावेळी पीडित मुलाचे आई-वडील आणि आरोपी शिक्षिकेचा पतीही घरीच होते. कसेबसे शेजाऱ्यांच्या मदतीने मुलाला बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर पालकांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर शिक्षकाला अटक करण्यात आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी