एक रन काढण्याच्या नादात 16 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू

Uttar Pradesh news, kanpur news, a 16 year old boy died due to heart attack in kanpur : उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एक रन काढण्याच्या नादात 16 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला.

Uttar Pradesh news, kanpur news
एक रन काढण्याच्या नादात 16 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • एक रन काढण्याच्या नादात 16 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू
  • हार्टअॅटॅक आल्यामुळे तरुणाचा खेळता खेळता मृत्यू
  • डॉक्टरांनी तपासणी करून दिली माहिती

Uttar Pradesh news, kanpur news, a 16 year old boy died due to heart attack in kanpur : उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. एक रन काढण्याच्या नादात 16 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. हार्टअॅटॅक आल्यामुळे तरुणाचा खेळता खेळता मृत्यू झाला. 

तरुण स्थानिक ओळखीतल्यांसोबत कानपूरमधील एका मैदानावर क्रिकेट खेळत होता. खेळताना रन काढण्यासाठी तो धावला आणि हार्टअॅटॅक आल्यामुळे मैदानातच कोलमडला. थोड्याच वेळात त्याचा मृत्यू झाला. खेळत असलेल्या इतरांनी तरुणाला लगेच हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे तपासणी केल्यावर डॉक्टरांनी तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

विधानसभा निवडणूक निकाल

होम लोन आणि कार लोन महागणार

तरुण ओळखीतल्यांसोबत कानपूर जिल्ह्यातील बीआयसी मैदानावर क्रिकेट खेळत होता. खेळत असताना रन काढण्यासाठी म्हणून तो  धावला. धावत असताना हार्टअॅटॅक आल्यामुळे तो मैदानात कोलमडला. 

तरुणाला ओळखणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मैदानात मृत्यू झालेल्या तरुणाला कोणताही आजार नव्हता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणाचे ओठ निळे पडले होते. त्याचा मृत्यू हार्टअॅटॅकमुळे झाल्याचे हे लक्षण आहे.

तरुणाचे वडील अनुज पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे दोन मुलगे सुमित आणि अनुज (16) मित्रासोबत बीआयसी मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. मैदानात खेळत असताना रन काढण्यासाठी अनुज धावला आणि त्यावेळी हार्टअॅटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला. 

मित्रांनी जवळ जाऊन बघितले तेव्हा अनुजच्या शरीराची हालचाल थांबल्याचे आणि निपचीत पडल्याचे दिसले. यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून अनुजचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी