६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, दोन अल्पवयीन भावांचं घृणास्पद कृत्य

Rape and Murder case: एका सहा वर्षाच्या मुलीवर दोन अल्पवयीन भावांनी बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

rapegirl-child_Representative Image
६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, दोन अल्पवयीन भावांचं घृणास्पद कृत्य  |  फोटो सौजन्य: Representative Image

थोडं पण कामाचं

  • ६ वर्षाच्या मुलीवर बल्ताकार करुन दोघा भावांनी केली हत्या
  • १५ आणि १२ वर्षांच्या मुलांनी केलं घृणास्पद कृत्य 
  • मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आरोपींच्या आईनेही केली मदत

लखीमपूर: दोन अल्पवयीन भावांनी एका सहा वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची अतिशय धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. या घटनेविषयी पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, पहिलीत शिकाणीर एक चिमुरडी मंगळवारी दुपारी अचानक बेपत्ता झाली होती. ती शेवटची आरोपींच्या घराजवळच दिसली होती. त्यामुळेच या प्रकरणाचा झटपट उलगडा होण्यास पोलिसांना मदत झाली. 

जेव्हा मुलगी घरी परतली नाही तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरु केला. पण काही केल्याने मुलगी सापडत नसल्याने अखेर कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली. ज्यानंतर पोलिसांनी मुलीचा शोध सुरु केला. यावेळी मुलीला शोधण्यासाठी पोलिसांनी बरेच प्रयत्न केले. तक्रार दाखल झाल्यानंतर जवळजवळ रात्रभर पोलीस मुलीचा शोध घेत असल्याचं येथील पोलीस अधिक्षक पूनम यांनी सांगितलं. 

बुधवारी सकाळच्या सुमारास पोलिसांना मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला आरोपीच्या आईची चौकशी केली. ज्यामध्ये अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींच्या आईने पोलिसांसमोर कबूल केलं की, जेव्हा तिला समजलं की, तिच्या मुलांनी मुलीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्या मुलांना मदत केली. 

याबाबत पोलिसांनी अशीही माहिती दिली की, 'मुलीचा मृतदेह हा आरोपींच्या घरापासून जवळजवळ २०० मी. दूर सापडलं. आरोपींनी आम्हाला असं सांगितलं की, मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवून आमच्या घरात बोलवलं होतं.' 

दरम्यान, दोन्ही अल्पवयीन आरोपींनी आपलं शिक्षण सोडलं आहे. त्यांचं वय १५ आणि १२ वर्ष इतकं आहे. त्यांचे कुटुंबीय हे कामगार आहेत. दरम्यान, आरोपींनी मान्य केलं आहे की, त्यांनी मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी भावांना आणि त्यांच्या आईला अटक केली आहे. या तिघांविरोधात हत्या तसंच पुरावा नष्ट करण्याप्रकरणी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या संपूर्ण घटनेमुळे काही प्रश्न मात्र उपस्थित केले जात आहे. एवढ्या लहान वयात मुलं अशा प्रकारचं कृत्य करण्यास उद्युक्त झालीच कशी? आज समाजात यामुळे मोठ्या प्रमाणात गढूळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे सक्षम समाज तयार करायचा असल्यास मुलांच्या संस्करांचा पाया देखील तेवढाच मजबूत करणं गरजेचं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी