धक्कादायक Video - स्कूटरवरून फटाके  नेत असताना भीषण स्फोट, बाप लेकाचा जागीच मृत्यू

Shocking Video cracker busted on Scooter : पुद्दुचेरीमध्ये बापलेक स्कूटरवरून फटाके घेऊन जात होते. या फटाक्यांचा भीषण स्फोट झाल्याने  पिता पूत्राचा जागीच मृत्यू झाला आहे. वडिलांचे नाव कलईनैसन आणि मुलाचे नाव प्रदीप असल्याचे सांगितले आहे.

A 7 year old boy and his father died on the spot after the crackers that they were carrying exploded in Villupuram.
स्कूटरवरून फटाके  नेत असताना भीषण स्फोट, बाप लेकाचा मृत्यू 
थोडं पण कामाचं
  • पुद्दुचेरीमध्ये बापलेक स्कूटरवरून फटाके घेऊन जात होते.
  • या फटाक्यांचा भीषण स्फोट झाल्याने  पिता पूत्राचा जागीच मृत्यू झाला आहे.
  • प्रदीप हा सात वर्षांचा होता.

Shocking Video cracker busted on Scooter in Pudducherry : पुद्दुचेरीमध्ये बापलेक स्कूटरवरून फटाके घेऊन जात होते. या फटाक्यांचा भीषण स्फोट झाल्याने  पिता पूत्राचा जागीच मृत्यू झाला आहे. वडिलांचे नाव कलईनैसन आणि मुलाचे नाव प्रदीप असल्याचे सांगितले आहे. प्रदीप हा सात वर्षांचा होता.

मिळालेल्या माहितीनुसार विल्लुपुरम जिल्ह्यातील कोट्टाकुप्पममध्ये पिता पुत्र एका स्कूटरवरून फटाक्यांनी भरलेल्या दोन पिशव्या घेऊन जात होते. तेव्हा रस्त्यातच या फटाक्यांचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की त्यात पिता पुत्रांचा जागीच मृत्यू झाला. दोघांच्या मृतदेहांचे तुकडे तुकडे झाले आणि रस्त्यावर विखुरले गेले.ॉ

या स्फोटात जवळील तीन दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. दरम्यान या फटाक्यांचा स्फोट कशामुळे झाला याचे कारण समोर आलेले नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी