धक्कादायक! ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या तोंडात माती टाकून बलात्कार आणि हत्या

लोकल ते ग्लोबल
Updated Nov 21, 2020 | 15:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

मध्यप्रदेशातून एक ह्रदयद्रावक घटना उघडकीस आली असून, येथे 70 वर्षीय वृद्ध महिलेची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या महिलेची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली आहे ते ऐकल्यावर सर्वांनाच बसला धक्का.

Symbolic photograph
प्रतिकात्मक छायाचित्र   |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • 70 वर्षीय वृद्ध महिलेची बलात्कार करून निर्घृण हत्या
  • मध्यप्रदेशची राजधानी भोपाळपासून ८० किमी अंतरावर असलेल्या विदिशा जिल्ह्यातील ग्यारसपूर पोलीस स्टेशन परिसरातील घटना
  • महिलेवर झालेल्या क्रूर अत्याचारामुळे संपूर्ण गावात तणावाची परिस्थिती

भोपाळ : मध्यप्रदेशा (Madhya Pradesh)तून एक ह्रदयद्रावक घटना उघडकीस आली असून, तेथे ७० वर्षीय वृद्ध महिलेची बलात्कार करून निर्घृण हत्या (Rape and murder) करण्यात आली आहे. या महिलेची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली आहे ते ऐकल्यावर सर्वांनाच एक धक्का बसला. आरोपींनी त्या वयोवृद्ध महिलेच्या तोंडात माती टाकली आणि तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर आरोपींनी तिच्या प्रायव्हेट पार्टवर लाठी-काठ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

ही घटना मध्यप्रदेशची राजधानी भोपाळपासून ८० किमी अंतरावर असलेल्या विदिशा जिल्ह्यातील ग्यारसपूर पोलीस स्टेशन परिसरातील आहे. बुधवारी रात्री शेतातल्या झोपडीत झोपली असताना त्या महिलेवर हा प्रसंग ओढवला. पीडित महिलेच्या मुलाने सांगितले की, ती शेतात भाजीपाला, पिकावरील देखरेखीसाठी अनेकदा तिथेच झोपायची आणि सकाळी घरी परतायची. गुरुवारी सकाळी ती परत आली नाही तेव्हा तो आईला भेटायला शेतात गेला, त्यावेळी तेथे त्याच्या आईचा मृतदेह आढळला.

पीडित वृद्ध महिलेचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळला. या महिलेवर झालेल्या क्रूर अत्याचारामुळे संपूर्ण गावात तणावाची परिस्थिती आहे, त्या दृष्टीने येथे मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. पोलिसांच्या तपासणीत महिलेच्या खासगी भागावर खोल जखम झाल्याचे आढळले आहे. तसेच असे दिसत आहे की, महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता.

घटनास्थळावरून महिलेचा छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. गावाच्या सरहद्दीवर शेताजवळील झुडपांमध्ये ग्रामस्थांनी महिलेचा मृतदेह पाहिला आणि तिच्या कुटूंबातील सदस्यांना व पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पुढील कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी