Solar Flare : सूर्याच्या पृष्ठभागावर झाला मोठा स्फोट, स्फोटाचे पृथ्वीवर होणार 'हे' परिणाम; बाबा वेंगाची का सुरू झाली चर्चा?

Solar Flare : गेल्या चार वर्षांतील स्फोटांपेक्षा हा सर्वात मोठा स्फोट ठरला आहे. स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने (Space Weather Prediction Center) याची माहिती दिली आहे. सूर्यावरील 'AR 2838' नावाच्या सनस्पॉटवर हा स्फोट झाला आहे.

big explosion on the surface of the sun
सूर्याच्या पृष्ठभागावर झाला मोठा स्फोट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सूर्याच्या पृष्ठभागावर सौर ज्वाळा म्हणजे सोलर फ्लेयरमुळे (Solar Flare)स्फोट होतात.
  • हा स्फोट 'AR 2838'नावाच्या सनस्पॉटवर झाला आहे.
  • अटलांटिक महासागरावरील शॉर्टवेव्ह रेडिओ ब्लॅकआउटमुळे पृथ्वीवरील सौरवादळाचे परिणाम जाणवले.

Solar Flare : सूर्याच्या (sun) पृष्ठभागावर मोठा स्फोट झाला आहे. गेल्या चार वर्षांतील सूर्याच्या पृष्ठभागावर हा सर्वात मोठा स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे. गेल्या चार वर्षांतील स्फोटांपेक्षा हा सर्वात मोठा स्फोट ठरला आहे. स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने (Space Weather Prediction Center) याची माहिती दिली आहे. सूर्यावरील 'AR 2838' नावाच्या सनस्पॉटवर हा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर भविष्यावाणी करणारे बाबा वेंगाची (Baba Venga) चर्चा एकदम सुरू झाली आहे. (big explosion on the surface of the sun,What effect will on Earth?)
अधिक वाचा  :  पराभवानंतर कर्णधार हार्दिकची गोलंदाजांवर आगपाखड

बाबा वेंगा यांनी 111 वर्षांपूर्वी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, त्यापैकी अनेक आजपर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा यांनी 2023 सालासाठी अनेक भाकिते केली होती, जी खरी ठरली तर पृथ्वीवर कहर होईल. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. ज्यानंतर पृथ्वीची कक्षा बदलू शकते आणि पृथ्वीवर इतर अनेक मोठे बदल होऊ शकतात. या खगोलीय घटनेचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे बाबा वेंगा यांनी सांगितले होते. त्यांची ही भविष्यवाणी ऐकल्यानंतर बाबा वेंगा यांची चर्चा सुरू झाली. 

सूर्यावरील स्फोटाचे काय होणार परिणाम

सूर्याच्या पृष्ठभागावर सौर ज्वाळा म्हणजे सोलर फ्लेयरमुळे (Solar Flare)स्फोट होतात. या स्फोटाला X1.5श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. या सौर स्फोटाकडे नवीन सौरचक्र म्हणून पाहिले जात आहे. परंतु हा स्फोट गेल्या चार वर्षातील सूर्याच्या पृष्ठभागावर हा सर्वात मोठा स्फोट आहे.  

अधिक वाचा  : नाशकात उद्योजकाच्या 12 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि सुटका

स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट 'AR 2838'नावाच्या सनस्पॉटवर झाला आहे. सूर्याच्या उत्तर-पश्चिम दिशेला हा सनस्पॉट होता, त्यावर स्फोट झाला. येत्या काही आठवड्यांत हा सनस्पॉट जागा बदलण्याचीही शक्यता आहे. हा सनस्पॉट काही काळ त्याच जागी राहिला तर तो पृथ्वीवरूनही दिसू शकतो. अटलांटिक महासागरावरील शॉर्टवेव्ह रेडिओ ब्लॅकआउटमुळे पृथ्वीवरील सौरवादळाचे परिणाम जाणवले. 

अधिक वाचा  :  धुळ्यातून तृतीयपंथी चाँद तडवी देतेय पोलीस भरतीची परीक्षा

सौर स्फोट किंवा सौरवादळ म्हणजे काय?

सौर स्फोट किंवा सौरवादळ (Sun Strom)म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होऊन मोठ्या सौर ज्वाळा  तयार होतात. सूर्यावरील चुंबकत्वामुळे तापमान वाढून हे स्फोट होतात. या स्फोटामुळे नंतर सौर वादळ तयार होतं. सूर्यावर होणारे स्फोट अणुबॉम्बइतके शक्तिशाली असू शकतात. सूर्यावरील वायूंचे घर्षण होऊन हे स्फोट होतात, तेव्हा त्यातून ज्वाला बाहेर पडतात, याला सौर ज्वाळा म्हणतात. या ज्वाळानंतर ते पृथ्वीच्या तसेच सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या दिशेने फेकल्या जातात.

दरम्यान, सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाहीये. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाही नासाने आपल्या सोलर डायनॅमिक्स वेधशाळेचा वापर करुन सौरवादळाची फोटो टिपला होता. त्याच महिन्यात,  CESSI जे सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सने या भारतीय संस्थेने सूर्याच्या पृष्ठभागावर भविष्यात होणाऱ्या स्फोटांची शक्यता असल्याचं सांगितलं होतं.

पृथ्वीवर काय परिणाम होईल?

सौर ज्वाळा पृथ्वीच्या दिशेने आल्यास याचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. या सौर ज्वाळामुळे ज्वालामुखी आणि रेडिओ कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिड्स, GPSवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे अंतराळयान आणि अंतराळवीरांनाही धोका निर्माण होऊ शकतो.  सौर वादळ किंवा सौर त्सुनामी येऊ शकते. या सौर वादळांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीवर परिणाम होईल आणि त्यामुळे पृथ्वीच्या वेगात बदल होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी