अमेरिकेत समलैंगिक विवाहाला फेडरल संरक्षण देणारे विधेयक मंजूर

अमेरिकेत (america) समलिंगी (homosexual) विवाहाची (marriage) चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे. कारण यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने (US House of Representatives) समलिंगी विवाहाला फेडरल संरक्षण (Federal protection) देणारे विधेयक मंजूर (Bill passed) केले आहे. मंगळवारी हे विधेयक 267 पैकी 157 मतांनी मंजूर झाले.

A bill giving federal protection to same-sex marriage
अमेरिकेत समलैंगिक विवाहाला फेडरल संरक्षण   |  फोटो सौजन्य: Indiatimes

यूएस : अमेरिकेत (america) समलिंगी (homosexual) विवाहाची (marriage) चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे. कारण यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने (US House of Representatives) समलिंगी विवाहाला फेडरल संरक्षण (Federal protection) देणारे विधेयक मंजूर (Bill passed) केले आहे. मंगळवारी हे विधेयक 267 पैकी 157 मतांनी मंजूर झाले. मंगळवारी, 47 रिपब्लिकन खासदारांनीही यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये या विधेयकाचे समर्थन केले.

दरम्यान, हे विधेयक कनिष्ठ सभागृहात मंजूर होऊनही सिनेटमध्ये मंजूर होईल की नाही याबद्दल अनिश्चितता कायम आहे. सिनेटमध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोन्ही पक्षांचे 50 संसद सदस्य आहेत. अशा परिस्थितीत हे विधेयक मंजूर होण्यासाठी डेमोक्रॅट पक्षाला किमान 10 रिपब्लिकन खासदारांना आपल्या बाजूने आणावे लागेल. 

न्यायालयाने यापूर्वी सुनावलेला गर्भपाताचा जुना निर्णय रद्द केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय समलिंगी विवाहाबाबतच्या आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची शक्यता आहे. कारण, सध्या यूएस सुप्रीम कोर्टात कंझर्व्हेटिव्ह न्यायमूर्तींची संख्या जास्त आहे, जे समलिंगी विवाह आणि गर्भपाताबद्दल त्यांच्या पुराणमतवादी विचारांसाठी ओळखले जातात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी