Lover Cheat Beloved : तिने त्याच्यावर जिवापाड प्रेम केलं अन् त्याने तिला पैशांसाठी विकलं; 3 वर्षानंतर वैकुंठ यातनेतून तरुणीची सुटका

मुलीनो, तु्म्ही कोणावर प्रेम करत असाल तर सावधान. कमी वयातील प्रेम हे धोकादायक असतं. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात प्रेमाची अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीला तिच्याच प्रियकराने विकले आहे. रौता बाजार रेड लाईट परिसरात (red light area) तरुणीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय (Prostitution) सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.

a boy Sold his Girlfriend to for money
प्रियकरानं पैशांसाठी प्रेयसीला विकलं   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पोलिसांनी रेड लाईट एरियाच्या संचालिकेला अटक केली आहे.
  • तरुणीला बळजबरीने देहविक्री करावी लागत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पूर्णिया : मुलीनो, तु्म्ही कोणावर प्रेम करत असाल तर सावधान. कमी वयातील प्रेम हे धोकादायक असतं. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात प्रेमाची अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलीला तिच्याच प्रियकराने विकले आहे. रौता बाजार रेड लाईट परिसरात (red light area) तरुणीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय (Prostitution) सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. मीडिया रिपोर्टनुसार स्थानिक पोलीस टीम फोर्ससह रेड लाईट एरियात पोहोचले आणि मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. 

पोलिसांनी रेड लाईट एरियाच्या संचालिकेला अटक केली आहे. रेड लाईट एरियातून सुटका झाल्यानंतर मुलीने आपली वेदनादायक कहाणी पोलिसांना सांगितली. एका तरुणीला बळजबरीने देहविक्री करावी लागत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर एक पोलीस पथक तयार करण्यात आले.

काय आहे नेमका प्रकार -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे तीन वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील तरुणीला एका तरुणाने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.  नंतर तिला दिल्लीला नेले आणि तेथे विकले. यानंतर तिला पंजीपाड़ा येथे आणण्यात आले आणि त्या ठिकाणाहून मुलीला रौता बाजार रेड लाइट परिसर येथे आणण्यात आले. तेव्हापासून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते, अशी माहिती डीएसपी आनंद मोहन गुप्ता यांनी दिली.

यामुळे या दलदलीतून बाहेर पडण्याची विनंती पीडितेने केली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा रौता बाजार रेड लाइट परिसरातून तरुणीची सुटका केली. हा रेड लाइट एरिया चालवणारी त्याठिकाणची मुख्य तमन्ना हिलाही पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिला पश्चिम बंगालची रहिवासी आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी